Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा तेजी; निफ्टी 24,100च्या वर बंद, मिडकॅप शेअर्समध्ये वाढ

Share Market Closing Today: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये सपाट सुरुवात झाली असली, तरी रिकव्हरी झाली आणि बाजार चांगल्या वाढीसह बंद झाले. मिडकॅप निर्देशांक 1% वाढीसह बंद झाला.
Share Market today Sensex, Nifty
Share Market Latest UpdateSakal

Share Market Closing Latest Update 1 July 2024: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये सपाट सुरुवात झाली असली, तरी रिकव्हरी झाली आणि बाजार चांगल्या वाढीसह बंद झाले. मिडकॅप निर्देशांक 1% वाढीसह बंद झाला.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात चांगली वाढ दिसून आली. निफ्टी 131 अंकांनी वाढून 24,141 वर बंद झाला. सेन्सेक्स 443 अंकांनी वाढून 79,476 वर आणि निफ्टी बँक 232 अंकांनी वाढून 52,574 वर बंद झाला.

शेअर बाजाराच्या तेजीत आयटी क्षेत्राचा मोठा वाटा होता, ज्यामध्ये मोठी खरेदी दिसून आली. ऑटो सेक्टर, एफएमसीजी सेक्टरमध्येही वाढ झाली, तर पीएसयू बँक आणि एनर्जी सेक्टरमध्ये किंचित विक्री झाली.

सुरुवातीच्या घसरणीनंतर बँकिंग क्षेत्रातही खरेदी झाली आणि एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक सारख्या शेअर्समध्ये वाढ झाली. दिवसअखेर एचडीएफसी बँकेने 1.20 टक्क्यांची वाढ नोंदवली आणि रु. 1700 च्या पातळीच्या पुढे बंद झाला. हेवीवेट HDFC बँक लि.च्या वाढीमुळे निफ्टी आणि बँक निफ्टी चांगल्या अंकांवर बंद झाले.

निफ्टीची नवीन पातळी

शेअर बाजारात सतत तेजीचे वातावरण आहे आणि आता निफ्टीची नवीन सपोर्ट पातळी 24000 झाली आहे. सोमवारच्या ऑप्शन चेन डेटामध्ये, 24000 च्या स्ट्राइक प्राइसवर पुट राइटिंगचे प्रमाण आढळून आले आहे, ज्यामुळे ही पातळी निफ्टीसाठी एक महत्त्वाचा आधार बनली आहे.

Share Market today Sensex, Nifty
T20 World Cup 2024: भारतीय खेळाडू होणार मालामाल; ब्रँड व्हॅल्यूमध्ये झाली मोठी वाढ, असा पडणार पैशांचा पाऊस

अदानी-अंबानींचे शेअर्स घसरले

आज एनटीपीसीचे शेअर्स सुमारे 2.25 टक्के घसरले. एसबीआय, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक या बँकिंग-फायनान्स शेअर्सवर दबाव दिसून आला.

देशांतर्गत शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्येही आज 0.37 टक्क्यांनी घसरण झाली. त्याच वेळी, अलीकडे सेन्सेक्सचा भाग बनलेल्या अदानी समूहाचा एकमेव शेअर असलेल्या अदानी पोर्ट्समध्येही घसरण झाली.

Share Market today Sensex, Nifty
Credit Growth: गोल्ड लोन घेणाऱ्यांची संख्या वाढली; तर क्रेडिट कार्डच्या खर्चातही मोठी वाढ, काय आहे कारण?

गुंतवणूकदारांनी 3.88 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 1 जुलै रोजी वाढून 443.12 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 28 जून रोजी 439.24 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.88 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.88 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com