Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टीमध्ये किंचित वाढ, कोणते शेअर टॉप गेनर्स?

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी (9 जुलै) हिरव्या रंगात व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्स 180 अंकांच्या आसपास वाढला होता. त्याचवेळी निफ्टीमध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली.
Share Market
Share Market Updates Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 9 July 2024: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी (9 जुलै) हिरव्या रंगात व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्स 180 अंकांच्या आसपास वाढला होता. त्याचवेळी निफ्टीमध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली. आज बँक निफ्टी घसरणीने उघडला, पण नंतर चांगली रिकव्हरी झाली. सेन्सेक्स 147 अंकांनी वाढून 80,107 वर उघडला.

निफ्टी 31 अंकांनी वाढून 24,351 वर तर बँक निफ्टी 35 अंकांनी घसरून 52,390 वर उघडला. मारुती सुझुकी, ब्रिटानिया आघाडीवर होते. आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आजही वाढ दिसून आली.

Share Market Today
Share Market OpeningSakal

गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून बाजार एका रेंजमध्ये आहे आणि 24400 ची पातळी निफ्टीसाठी रझिस्टंस आहे. त्याचप्रमाणे, डाउनसाइडवर, 24200 निफ्टीला चांगला सपोर्ट म्हणून काम करत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की बाजार एका दिशेने कल करण्यासाठी ट्रिगर आवश्यक आहे.

Share Market Today
Share Market OpeningSakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

क्षेत्रीय निर्देशांकांपैकी सर्व निफ्टी निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. मारुती सुझुकीच्या जोरावर ऑटो सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी बँक, आयटी, पीएसयू बँक, मेटल, वित्तीय सेवा, फार्मा, एफएमसीजी, तेल आणि गॅस यासह सर्व क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. रिअल्टी निर्देशांक सुरुवातीच्या काळात तेजीत होता जो लगेचच फ्लॅट झोनमध्ये घसरताना दिसला.

Share Market
Share Market History: वडाच्या झाडाखाली बसायचे, 5 जणांनी मिळून असा सुरू केला मुंबईचा शेअर बाजार
Share Market Today
BSE SENSEXSakal

BSE चे मार्केट कॅप किती?

बीएसईचे मार्केट कॅप 451.97 लाख कोटी रुपये झाले आहे. BSE वर एकूण 3267 शेअर्सचे व्यवहार होत आहेत, त्यापैकी 2070 शेअर्सची वाढ होत आहे. 1065 शेअर्सची घसरण सुरू आहे तर 132 शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत आहेत.

145 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 57 शेअर्सवर लोअर सर्किट आहे. 194 शेअर्स आहेत जे त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत आणि त्याच कालावधीत 12 शेअर्स त्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत.

सेन्सेक्सचे 24 शेअर्स तेजीत आहेत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 24 शेअर्स तेजीत आहेत. मारुती, एम अँड एम आणि आयटीसीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

Share Market
Employment: भारत पुरेशा नोकऱ्या देऊ शकत नाही...सिटी ग्रुपच्या अहवालावर सरकारनं दिलं उत्तर, काय म्हटलंय जाणून घ्या

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.96 लाख कोटींची वाढ

8 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,49,71,810.34 कोटी होते. आज म्हणजेच 9 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,51,68,389.00 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,96,578.66 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.