Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण सुरूच; अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती काय?

Sensex-Nifty Today: आज सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम झाला. प्रमुख निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह उघडले आणि नंतर थोडी रिकव्हरी दिसली. सेन्सेक्स 72600 आणि निफ्टी 22000 च्या खाली घसरला आहे.
Sensex, Nifty flat
Sensex, Nifty flat Sakal
Updated on

Market Opening Latest Update 14 March 2024 (Marathi News): आज सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम झाला. प्रमुख निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह उघडले आणि नंतर थोडी रिकव्हरी दिसली.

सेन्सेक्स 72600 आणि निफ्टी 22000 च्या खाली घसरला आहे. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग, FMCG, IT आणि मेटल क्षेत्रात झाली आहे, तर फार्मा, मीडिया आणि रियल्टी क्षेत्रात खरेदी होत आहे.

Share Market Opening
Share Market OpeningSakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारामध्ये, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात किंचित वाढ होत होती तर निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते.

Sensex, Nifty flat
बाजारात घसरण, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

सेन्सेक्स शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 9 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 21 शेअर्समध्ये घसरण होत आहे. M&M मध्ये सर्वाधिक 3.04 टक्के वाढ दिसून आली आणि टाटा स्टील 1.66 टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे. एनटीपीसी 1.12 टक्के आणि टाटा मोटर्स 1.09 टक्क्यांनी वर आहे. L&T 0.61 टक्के आणि TCS सुद्धा 0.59 टक्क्यांनी वाढत आहे.

Share Market Opening
Share Market OpeningSakal

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की या आठवड्यात शेअर बाजारात मंदीचा कल असू शकतो. याचे संकेत शुक्रवारी वॉल स्ट्रीट ट्रेडिंगमधून मिळत होते. या आठवड्यात निफ्टीमध्ये चढ-उतार होऊ शकतात.

अमेरिकेतील मुख्य चलनवाढीचे आकडे पाहता केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची योजना पुढे ढकलू शकते. बुधवारी 20 मार्च रोजी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीची माहिती समोर येणार आहे, त्यानंतर शेअर बाजारातील अस्थिरता वाढू शकते.

Sensex, Nifty flat
पानिपत, की गुंतवणुकीची उत्तम संधी?

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष आगामी लोकसभा निवडणुकीकडे आहे. पुढील महिन्यात 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार असून, त्याचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

शेअर बाजारात चर्चेत असणारे शेअर्स कोणते?

LIC: सरकारने 1.10 लाख कर्मचाऱ्यांसाठी एकूण 17% पगारवाढ जाहीर केली आहे.

ITC: कंपनीने इंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊसमधील 43.36% भागभांडवल खरेदी करण्यासाठी तिच्या उपकंपनी रसेल क्रेडिटद्वारे शेअर खरेदी करार केला आहे.

जिंदाल स्टेनलेस: कंपनीने कोलकाता येथे भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोसाठी स्टीलचा पुरवठा केला आहे. या प्रकल्पात 4,965 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.