Share Market Closing: शेअर बाजाराचे जोरदार 'कमबॅक'; सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Closing Today: शुक्रवारी (26 जुलै) भारतीय शेअर बाजाराने जोरदार 'कमबॅक' केले आहे. बाजार घसरणीसह उघडले होते, परंतु चांगली रिकव्हरी झाली आणि ट्रेडिंगच्या शेवटी मोठ्या तेजीसह बाजार बंद झाला.
Share Market
Share Market Latest UpdateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 26 July 2024: शुक्रवारी (26 जुलै) भारतीय शेअर बाजाराने जोरदार 'कमबॅक' केले आहे. बाजार घसरणीसह उघडले होते, परंतु चांगली रिकव्हरी झाली आणि ट्रेडिंगच्या शेवटी मोठ्या तेजीसह बाजार बंद झाला.

बंद होताना सेन्सेक्स 1300 अंकांनी वाढला. निफ्टी नवीन विक्रमी उच्चांक गाठून बंद झाला. निफ्टी 24,861 च्या विक्रमी उच्चांकावर बंद झाला. बँक निफ्टी 0.91% वाढला. आयटी आणि मेटल निर्देशांकात जोरदार वाढ झाल्याने बाजाराला पाठिंबा मिळाला.

Share Market Today
Share Market ClosingSakal

निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 47 शेअर्स वाढीसह बंद

निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 47 शेअर्स वाढीसह बंद झाले तर केवळ तीन शेअर्स घसरणीसह बंद झाले. श्रीराम फायनान्स 9.18 टक्के, सिप्ला 5 टक्के, भारती एअरटेल 4.50 टक्के, अपोलो हॉस्पिटल 4.37 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 3.60 टक्के, अदानी पोर्ट्स 3.75 टक्के, विप्रो 3.5 टक्के, अदानी पोर्ट्स 3.5 टक्के हे शेअर्स निफ्टी वाढण्यास कारणीभूत आहेत.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Share Market
Internship Scheme: एक कोटी तरुणांना 5 हजार रुपये कसे मिळणार? अर्थमंत्र्यांनी सांगितला प्लॅन

सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीत

बाजारातील तेजीमुळे सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक वाढ झाली, याशिवाय ऑटो शेअर्स, बँकिंग, फार्मा, हेल्थकेअर, ऊर्जा, मेटल, कंझ्युमर ड्युरेबल, ऑइल आणि गॅस, मीडिया आणि रिअल इस्टेट शेअर्स वाढीसह बंद झाले.

Share Market Today
BSE SENSEXSakal

भारतीय बाजारातील वाढीला जागतिक बाजारातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकन शेअर बाजार गुरुवारी वाढीसह बंद झाले. त्यामुळे शुक्रवारच्या सत्रात युरोपीय बाजार तेजीत आहेत. बाजारातील या नेत्रदीपक वाढीनंतर, India VIX, अस्थिरता मोजणारा निर्देशांक 3.01 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

Share Market
Tata Group: रतन टाटा मालामाल! 5 मिनिटांत कमावले 22,450 कोटी, केला नवा विक्रम

आयटी क्षेत्रात तेजी

अमेरिकेची अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढण्याच्या शक्यतेमुळे Mphasis, LTIMindTree आणि Infosys यांच्या नेतृत्वाखाली IT शेअर्स 7% वाढले. आयटी कंपन्या त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा अमेरिकेतून मिळवतात. आर्थिक वाढीमध्ये सुधारणा दर्शविणारी आकडेवारी या क्षेत्रासाठी चांगले लक्षण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.