Share Market Closing: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला; मेटल शेअर्समध्ये मोठी विक्री

Share Market Closing Today: गुरुवारी (8 ऑगस्ट) जागतिक बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि निफ्टीही जवळपास 60 अंकांच्या घसरणीसह उघडला.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 8 August 2024: गुरुवारी (8 ऑगस्ट) जागतिक बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि निफ्टीही जवळपास 60 अंकांच्या घसरणीसह उघडला.

बँक निफ्टी सपाट होता आणि निर्देशांक हिरवागार दिसत होता. सर्वात मोठी घसरण आयटी आणि मेटल शेअर्समध्ये दिसून आली. सर्वात मोठी घसरण इन्फोसिस, एलटीआय माइंडट्री, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये झाली.

निफ्टी दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. निफ्टी 180 अंकांनी घसरला आणि 24100 च्या जवळ बंद झाला. सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला आणि 78886 वर बंद झाला. निफ्टी बँक 40 अंकांनी वाढून 50150 च्या जवळ बंद झाला. मिड-स्मॉलकॅप निर्देशांकात वरच्या स्तरावरून नफा बुकिंग दिसून आले.

Share Market
RBI MPC: यूपीआय युजर्ससाठी आनंदाची बातमी! कर भरण्याची मर्यादा आता 5 लाख रुपये, RBIने केली घोषणा

कोणते शेअर्स वाढले?

आजच्या व्यवहारातील वाढत्या शेअर्सवर नजर टाकली तर, MRF शेअर्स 4.30 टक्के, Alchem ​​Lab 3.17 टक्के, ट्रेंट 3.14 टक्के, भारत फोर्ज 3.08 टक्के, Lupin 2.83 टक्के, Max Financial 2.08 टक्के, HDFC Life 2.03 टक्के, ICIMB 2.03 टक्के. 1.81 टक्के आणि जीएमआर 1.76 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

घसरलेल्या शेअर्समध्ये पिरामन एंटरप्रायझेस 4.31 टक्के, LTIMindtree 4.12 टक्के, श्री सिमेंट 3.81 टक्के, नोल्को 3.72 टक्के, ग्रासिम 3.50 टक्के, गोदरेज प्रॉपर्टीज 3.40 टक्के, सेल 2.95 टक्के, बर्जर पेंट्स 2.9 टक्के घसरणीसह बंद झाले.

Share Market
RBI MPC Meeting: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा मोठा निर्णय; तुमच्या कर्जावर होणार थेट परिणाम

गुंतवणूकदारांचे 2.79 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 8 ऑगस्ट रोजी 445.78 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 7 ऑगस्ट रोजी 448.57 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.79 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.79 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज 4,014 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. यापैकी 1,831 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,081 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 102 शेअर्स कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 235 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 25 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.