Share Market Opening: शेअर बाजारातील तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening: मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला आणि 73,200 च्या खाली व्यवहार करत आहे. निफ्टीही 42 अंकांनी घसरून 22,000 च्या जवळ आहे.
Share Market Updates Indices open in the red
Share Market Updates Indices open in the red Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 16 January 2024: मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला आणि 73,200 च्या खाली व्यवहार करत आहे. निफ्टीही 42 अंकांनी घसरून 22,000 च्या जवळ आहे. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव आहे. तर मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये खरेदीची नोंद होत आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकमध्ये किंचित वाढ झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात विप्रो, एचसीएल टेक आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

तर ओएनजीसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. यासोबतच बजाज फायनान्स, हिंदाल्को आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये वाढ झाली. एचडीएफसी लाइफचे शेअर्सही घसरले आहेत.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात जिओ फायनान्शियल आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर पेटीएम, आयआरईडीए, अश्निषा इंडस्ट्रीज आणि ब्रँड कॉन्सेप्टच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

अदानी यांच्या 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते, तर अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.

Share Market Updates Indices open in the red
स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; तब्बल १६ हजार १४५ मान्यताप्राप्त स्टार्टअपची नोंद

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये पतंजली फूड, देवयानी इंटरनॅशनल, गरवारे टेक्निकल फायबर्स, फेडरल बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक आणि मारुती सुझुकी यांचे शेअर्स वधारले.

तर अॅक्सिस बँक, आयआरसीटीसी, मुथूट फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय कार्ड आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Share Market Updates Indices open in the red
Toll Collection: देशात जीपीएसद्वारे टोलवसुली होणार सुरू; फास्टॅग होणार इतिहासजमा, कसं ते जाणून घ्या

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की निफ्टीचे पुढील लक्ष्य 22,290 ची पातळी असू शकते आणि जर निफ्टीने ही पातळी ओलांडली तर तो 22,500 ची पातळी गाठू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.