Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; मिडकॅप शेअर्स चमकले, मार्केट कॅप 427 लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर

Share Market Closing Today: दिवसभर प्रचंड चढ-उतारानंतर भारतीय शेअर बाजार दुसऱ्या दिवशीही सपाट बंद झाला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मात्र जोरदार खरेदी दिसून आली. ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये चमक दिसून आली.
Share Market Today
Share Market Latest UpdateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 11 June 2024: दिवसभर प्रचंड चढ-उतारानंतर भारतीय शेअर बाजार दुसऱ्या दिवशीही सपाट बंद झाला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मात्र जोरदार खरेदी दिसून आली. ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये चमक दिसून आली, आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 33 अंकांच्या घसरणीसह 76,456 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांच्या किंचित वाढीसह 23,265 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing
Share Market TodaySakal

गौतम अदानी समूहाचे 8 शेअर्स घसरले

शेअर बाजाराच्या कामकाजातील चढ-उतार दरम्यान, मंगळवारी गौतम अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी दोन कंपन्यांचे शेअर्स हिरव्या तर आठ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचे तर, पिडीलाइट इंडस्ट्रीज, टायटन, फिनोलेक्स केबल, गरवारे टेक्निकल फायबर्स आणि सर्व्होटेक पॉवर घसरणीसह बंद झाले. तर होम फर्स्ट फायनान्स, अशोक लेलँड, पॉलीकॅब इंडिया, महिंद्रा हॉलिडेज आणि फेडरल बँक या कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

Share Market Closing
Share Market TodaySakal
Share Market Today
NSE Warns Investors: डीपफेक व्हिडीओबाबत एनएसईने गुंतवणूकदारांना दिला इशारा; काय आहे संपूर्ण प्रकरण?

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, एनर्जी, मीडिया, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि तेल आणि गॅस क्षेत्राच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर बँकिंग, आयटी, हेल्थकेअर, फार्मा, एफएमसीजी, मेटल शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. मिडकॅप शेअर्स आणि स्मॉलकॅप शेअर्सने चमकदार कामगिरी केली. बाजारातील घसरणीनंतरही निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 0.77 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

Share Market Closing
BSE SENSEXSakal

मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर

भारतीय शेअर बाजार सपाट बंद झाला असेल पण BSE वर शेअर्सचे बाजार मूल्य विक्रमी उच्चांकावर बंद झाले आहे. एक्सचेंजमध्ये शेअर्सचे मूल्य 427.05 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. जे पहिल्या सत्रात 425.22 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या व्यवहारात मार्केट कॅप 1.83 लाख कोटी रुपयांच्या वाढीसह बंद झाला.

Share Market Today
Onion Prices: कांदा पुन्हा रडवणार? भाव 50 टक्क्यांनी वाढले; निवडणुका संपताच भाव का वाढले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 14 शेअर्स घसरणीसह बंद झाले. आज एकूण 3969 शेअर्सचे व्यवहार झाले त्यात 2467 वर तर 1397 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 376 शेअर्स अपर सर्किटमध्ये आणि 130 शेअर्स लोअर सर्किटमध्ये बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.