Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; सेन्सेक्स 71,700 च्या खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening: बुधवारी शेअर बाजार घसरला. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. संमिश्र जागतिक संकेतांचा परिणाम बाजारावर दिसत आहे. 200 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 71700 च्या खाली घसरला आहे.
Share Market opening
Share Market openingSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 3 January 2024: बुधवारी शेअर बाजार घसरला. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. संमिश्र जागतिक संकेतांचा परिणाम बाजारावर दिसत आहे. 200 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 71700 च्या खाली घसरला आहे.

निफ्टीही 50 अंकांनी घसरल्यानंतर 21600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात सर्वाधिक विक्री आयटी आणि बँकिंग क्षेत्रात होत आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात किंचित वाढ झाली, तर निफ्टी आयटी निर्देशांकात किंचित घसरण झाली.

आज अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब्स आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्ये वाढ होत होती, तर कोल इंडिया लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

आशियाई शेअर बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारातील भावनाही कमजोर राहण्याची अपेक्षा असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेअर बाजारात सध्या प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे त्यामुळे बाजारात घसरण कायम राहू शकते.

Share Market opening
RBI On Rs 2000 Note: 2000च्या नोटाबंदीनंतर 9330 कोटी रूपये आले नाहीत परत...RBIने जाहीर केली आकडेवारी

शेअर बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या नऊ कंपन्यांमध्ये वाढ झाली. अदानी एनर्जी सोल्युशन्स 9 टक्क्यांनी तर अदानी टोटल गॅस 8 टक्क्यांनी वधारले. एनडीटीव्ही, अदानी विल्मार, अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

शेअर बाजारात मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, मुथूट फायनान्स, बजाज फायनान्स, एसबीआय कार्ड, आयआरसीटीसी, गार्डन रीच शिप बिल्डर आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स वधारत होते.

तर देवयानी इंटरनॅशनल, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, पतंजली फूड्स, अॅक्सिस बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरले.

Share Market opening
Adani-Hindenburg: हिंडेनबर्गने अदानींवर केलेले आरोप कितपत खरे? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल

जागतिक बाजारात घसरणीचे संकेत

जागतिक बाजारात घसरणीचे संकेत आहेत. आशियाई बाजारात दीड टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गिफ्ट निफ्टीही जवळपास 75 अंकांनी घसरत आहे. काल, Nasdaq ने ऑक्टोबर नंतरची सर्वात मोठी घसरण पाहिली. काल Nasdaq 245 अंकांनी घसरला, पण Dow सपाट बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.