Share Market Opening Latest Update 17 May 2024: शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स 64 अंकांनी खाली तर निफ्टी 17 अंकांनी खाली आहे. बँक निफ्टीमध्येही 100 हून अधिक अंकांची घसरण पाहायला मिळत आहे. यापूर्वी विक्रमी उच्चांकानंतर अमेरिकन बाजारातही प्रॉफिट बुकींग दिसून आले.
आजच्या शेअर बाजारातील महत्त्वाचे मुद्दे:
10 वर्षांच्या रोखे उत्पन्नात किंचित वाढ
इतर किरकोळ शेअर्समध्ये खरेदी
युरोपातही बाजार मंदावला
कच्च्या तेलाचा दर दुसऱ्या दिवशी 83 डॉलरवर
सोन्याच्या दोन दिवसांच्या वाढीला ब्रेक
निफ्टीच्या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांकांसह निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकेमध्ये घसरण झाली. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निर्देशांकात वाढ झाली.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, इरकॉन इंटरनॅशनल, इंजिनिअर्स इंडिया आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये तेजी होती तर एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, लार्सन, विप्रो, एचसीएल या कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.
देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी वाढीसह बंद झाले. अमेरिकेतील चलनवाढीच्या कमकुवत आकडेवारीनंतर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ हे त्याचे कारण होते. यानंतर, 2024 मध्ये किमान दोनदा व्याजदर कपात होण्याची शक्यता शेअर बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डाऊ जॉन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजने प्रथमच 40,000 चा आकडा गाठला आहे. एप्रिलमधील कमकुवत चलनवाढीच्या आकडेवारीमुळे, त्यात वाढ झाली आहे आणि फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करेल अशी आशा बाजाराला आहे.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 8 शेअर्स तेजीत आहेत. M&M, टाटा मोटर्स आणि टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, ॲक्सिस बँक, एशियन पेंट आणि रिलायन्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. आज BSE वर 2,357 शेअर्सचे व्यवहार होत आहेत.
यामध्ये 1,538 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 711 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 108 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 72 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 12 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. 98 शेअर्स वरच्या सर्किटवर पोहोचले, तर 45 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.
एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 16 मे 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,07,35,829.32 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 17 मे 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,07,62,324.64 कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 26,495.32 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.