Share Market Opening: अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी 24,500च्या खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: बुधवारी (24 जुलै) भारतीय शेअर बाजारांची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स 130 च्या आसपास तर निफ्टी 30 अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टी 24,400 च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचवेळी सेन्सेक्स 80,200 च्या पातळीवर घसरला होता.
Share Market
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 24 July 2024: बुधवारी (24 जुलै) भारतीय शेअर बाजारांची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स 130 च्या आसपास तर निफ्टी 30 अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टी 24,400 च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचवेळी सेन्सेक्स 80,200 च्या पातळीवर घसरला होता.

बँक निफ्टी 200 हून अधिक अंकांनी घसरला होता आणि निर्देशांक 51,500 च्या आसपास घसरला होता. मिडकॅप निर्देशांकात वाढ झाली. एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्सवर दबाव होता.

Share Market
Share Market OpeningSakal

काल संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भांडवली नफा कर आणि एफ अँड ओ ट्रेडिंगमध्ये एसटीटी वाढवण्याच्या घोषणेमुळे बाजारात मोठी घसरण झाली होती, मात्र त्यानंतर बाजार सावरला होता. मात्र आता हळूहळू अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून येत आहे. FII ने काल देशांतर्गत बाजारात 12,800 कोटी रुपयांची विक्री केली होती.

Share Market
Share Market OpeningSakal

गुंतवणूकदार सध्या सुरक्षित गुंतवणुकीचे मार्ग शोधत आहेत

आयटीसी, विप्रो, बीपीसीएल, कोल इंडिया हे सुरुवातीच्या व्यापारात निफ्टी 50मध्ये वाढणारे शेअर्स आहेत, तर बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर, ब्रिटानिया, बजाज फिनसर्व्ह सारख्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारात सर्वाधिक घसरण दिसून येत आहे.

एफएमसीजी, फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी होताना दिसत आहे. गुंतवणूकदार सध्या सुरक्षित गुंतवणुकीचे मार्ग शोधत आहेत आणि त्यामुळे त्यांचा कल FMCG आणि फार्मा सारख्या बचावात्मक क्षेत्रांकडे दिसत आहे. वाहन आणि ऊर्जा क्षेत्रात विक्री होताना दिसत आहे.

Share Market
Tata Group: निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय अन् रतन टाटांनी केली 19 हजार कोटींची कमाई; नेमकं काय घडलं?
Share Market
BSE SENSEXSakal

भारतीय बाजार दीर्घ मुदतीसाठी तेजीचे मानले जातात. निफ्टीसाठी, 24000 ही सपोर्ट पातळी म्हणून पाहिली जात आहे. कॅपिटल गेन टॅक्समध्ये वाढ झाल्यानंतर अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. बाजार खालच्या स्तरावरून सावरले असले तरी ते घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 92 हजार कोटींची वाढ

23 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,46,40,877.82 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 24 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,47,32,951.74 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 92,073.92 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market
Union Budget 2024 : उद्योग,रोजगाराची ‘रिमझिम’

सेन्सेक्सचे 9 शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी फक्त 9 शेअर्स तेजीत आहेत. सर्वात जास्त वाढ आयटीसी, टायटन आणि एअरटेलमध्ये झाली आहे. दुसरीकडे, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि नेस्लेमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे.

आज BSE वर 2416 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1572 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 713 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 131 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 79 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 10 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 97 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 39 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.