Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; बँकिंग आणि आयटी क्षेत्रावर दबाव, कोणते शेअर्स तेजीत?

Sensex-Nifty Today: नव्या उच्चांकानंतर मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स जवळपास 150 अंकांनी घसरला आणि 73900 च्या खाली आला. निफ्टी देखील 22500 च्या खाली व्यवहार करत आहे.
Share Market Updates Sensex, Nifty marginally down at open, led by IT, Health, FS, Bank
Share Market Updates Sensex, Nifty marginally down at open, led by IT, Health, FS, Bank Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 2 April 2024 (Marathi News): नव्या उच्चांकानंतर मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स जवळपास 150 अंकांनी घसरला आणि 73900 च्या खाली आला. निफ्टी देखील 22500 च्या खाली व्यवहार करत आहे. बँकिंग, आयटी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव आहे. निफ्टी आयसीआयसीआय बँक सर्वाधिक घसरले आहेत, तर अदानी पोर्ट सर्वाधिक तेजीत आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण होती तर निफ्टी मिड कॅप आणि निफ्टी बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ झाली होती. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्येही घसरण झाली.

Sensex Today
Sensex TodaySakal

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्समध्ये वाढ तर 19 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. एचडीएफसी बँक टॉप गेनर आहे आणि तो 1.39 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. इंडसइंड बँक 1.32 टक्क्यांनी वर आहे. टायटन 0.85 टक्क्यांनी तर टाटा मोटर्स 0.55 टक्क्यांनी वर आहे. नेस्ले 0.51 टक्के आणि NTPC 0.31 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

Nifty Today
Nifty TodaySakal

आशियाई शेअर बाजारात तेजी

GIFT निफ्टी निर्देशांकात घसरण असूनही, इतर आशियाई शेअर बाजारांमध्ये वाढ दिसून आली. या पातळीवर गुंतवणूकदार नफा बुक करू शकतात, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Share Market Updates Sensex, Nifty marginally down at open, led by IT, Health, FS, Bank
RBI MPC Meeting: 5 एप्रिलला होणार व्याजदराबाबत मोठा निर्णय; RBI व्याजदरात बदल करणार का?

सोमवारी शेअर बाजारात वाढ होऊनही परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली. या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणापूर्वी गुंतवणूकदार शेअर बाजारात सावध राहून व्यवहार करतील. अशी शक्यता आहे.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी समूहाच्या 10 पैकी 6 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते तर चार शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. अदानी पॉवरचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत होते तर एनडीटीव्हीचे शेअर्स एक टक्क्यांनी घसरले होते.

Share Market Updates Sensex, Nifty marginally down at open, led by IT, Health, FS, Bank
GST Collection: मार्चमध्ये झाले दुसरे सर्वात मोठे जीएसटी संकलन; 2023-24चे उत्पन्न 1.78 लाख कोटींच्या पुढे

आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चर्चेत असणार?

मारुती सुझुकी इंडिया: कंपनीने या वर्षी मे महिन्यात 1.63 लाख प्रवासी वाहने विकली. तर गेल्या वर्षी हा आकडा दीड लाख युनिट होता. एकूण उत्पादन 1.54 लाख युनिटवरून 1.67 लाख युनिटपर्यंत वाढले आहे.

अशोक लेलँड: कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री मार्चमध्ये वार्षिक 7% ने घटून 22,885 युनिट्सवरून 21,317 युनिट्सवर आली.

इन्फोसिस: कंपनीला आर्थिक वर्ष 20-21 साठी 341 कोटी रुपयांची कर मागणी ऑर्डर नोटीस मिळाली आहे.

TVS मोटर: कंपनीची एकूण विक्री वार्षिक आधारावर 12% वाढून 3.17 लाख युनिट्सवरून 3.55 लाख युनिट झाली आहे. तर मोटरसायकल विक्रीत 22% वाढ झाली आहे आणि एकूण विक्री 1.72 लाख युनिट्स झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.