Share Market Opening Latest Update 18 June 2024: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी जोरदार सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स-निफ्टीसोबतच निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. सेन्सेक्स 243 अंकांच्या वाढीसह 77,235 वर उघडला आणि उघडल्यानंतर 77,326 च्या नवीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.
निफ्टी 105 अंकांनी वाढून 23,570 वर उघडला आणि 23,573 वर गेला. निफ्टी बँक निर्देशांक 192 अंकांच्या वाढीसह 50,194 वर उघडला. निफ्टी बँकेत घसरण दिसून आली आणि तो 270 अंकांनी घसरला. संरक्षण शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.
निफ्टीने आज मंगळवारी इतिहासात प्रथमच 23500 ची पातळी ओलांडली. जून एक्सपायरी मालिकेत निफ्टी 24000 ची पातळी गाठण्याची शक्यता विश्लेषक वर्तवत आहेत. आज निफ्टीने 23,573 चा नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला, तर सेन्सेक्सने 77,326 चा नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला.
इथून मार्केट वर जाण्यासाठी वरच्या पातळीवर कंसोलिडेशन आवश्यक आहे, अन्यथा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगही होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सेन्सेक्सने प्रथमच 77300 चा टप्पा पार केला. अशा प्रकारे मंगळवारच्या व्यापार सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्सने नवा सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केला.
बीएसईचे बाजार भांडवल सातत्याने नवीन विक्रमी पातळी गाठत आहे आणि आता ते 437.22 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. हा त्याचा विक्रमी उच्चांक आहे. अमेरिकन डॉलरमध्ये बाजार भांडवल 5.23 ट्रिलियन डॉलरवर पोहचले आहे.
सध्या बीएसईमध्ये 3419 शेअर्सची खरेदी-विक्री होत असून, त्यापैकी 2106 शेअर्समध्ये वाढ होत आहे. 1168 शेअर्समध्ये घसरण झाली आहे तर 145 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत. 194 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 67 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.
एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 14 जून 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,34,88,147.51 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 18 जून 2024 रोजी बाजार उघडताच तो 4,36,92,883.04 कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 2,04,735.53 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 25 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. विप्रो, इन्फोसिस आणि एमअँडएममध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, मारुती, टीसीएस आणि एचडीएफसी बँकेत सर्वाधिक घसरण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.