Share Market Opening: शेअर बाजारात विक्री सुरूच, सेन्सेक्स 71300च्या जवळ, निफ्टी 21700च्या पातळीवर

Share Market Opening: शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह उघडला. सेन्सेक्स 110 अंकांनी घसरून 71,300 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टी 20 अंकांनी घसरून 21,700च्या जवळ व्यवहार करत आहे. बँकिंग, ऑटो, फायनान्शिअल आणि आयटी क्षेत्रात विक्री होत आहे.
Sensex, Nifty flat
Sensex, Nifty flat Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 9 February 2024: शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह उघडला. सेन्सेक्स 110 अंकांनी घसरून 71,300 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टी 20 अंकांनी घसरून 21,700च्या जवळ व्यवहार करत आहे. बँकिंग, ऑटो, फायनान्शिअल आणि आयटी क्षेत्रात विक्री होत आहे. M&M आणि भारती एअरटेल निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली. शुक्रवारच्या व्यवसायात क्षेत्रीय निर्देशांक निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी तेजीसह व्यवहार करत आहेत.

(Share Market Updates Sensex, Nifty red; Metal, Oil&Gas suffer; Broader markets falter)

Sensex, Nifty flat
SIP Investment: ‘एसआयपी’ने नोंदविले नवे विक्रम; जानेवारी महिन्यात गुंतवणुकीसह खात्यांची संख्याही सर्वोच्च
शेअर बाजारात विक्री
शेअर बाजारात विक्रीSakal

कोणते शेअर्स वाढले?

सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दर्शवणाऱ्या शेअर्समध्ये ब्रिटानिया, टाटा कंझ्युमर, सिप्ला, आरआयएल, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली. महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, हिंदाल्को, बीपीसीएल, मारुती सुझुकी, एचडीएफसी लाईफ आणि कोल इंडिया या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

कोणते शेअर्स वाढले?
कोणते शेअर्स वाढले? Sakal

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आशियाई शेअर बाजारातील संमिश्र कल आणि अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरणात कोणतीही मोठी घोषणा न केल्यामुळे शेअर बाजारावर दबाव आला आहे.

Sensex, Nifty flat
Life Insurance Corporation Of India : ‘एलआयसी’ला तिमाहीत ९४४४ कोटींचा नफा

झोमॅटोचा शेअर 52आठवड्यांच्या उच्चांकावर

झोमॅटोचे शेअर्स शुक्रवारी 151.40 वर पोहोचले, जे 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत. कंपनीचे शेअर्स इंट्राडे 5.07% वाढून 151.40 च्या उच्चांकावर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ डिसेंबर तिमाही निकाल आणि ब्रोकरेजच्या सकारात्मक मतानंतर झाली आहे.

एलआयसीचे मार्केट कॅप 7 लाख कोटी रुपयांच्या पुढे

एलआयसीच्या शेअर्सचे मार्केट कॅप शुक्रवारी 7 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. शेअरने इंट्राडेमध्ये 1,175 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली आहे, ज्यामुळे मार्केट कॅप वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.