Share Market Opening: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; सेन्सेक्स 72,300 आणि निफ्टी 21,900 जवळ, श्रीराम फायनान्स तेजीत

Share Market Today: गुरुवारी शेअर बाजार सपाट उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक किंचित तेजीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 72,250 आणि निफ्टी 21,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी 50 मध्ये समावेश झाल्याच्या बातमीनंतर श्रीराम फायनान्समध्ये प्रचंड तेजी दिसत आहे.
Share Market opening
Share Market opening Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 29 February 2024: गुरुवारी शेअर बाजार सपाट उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक किंचित तेजीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 72,250 आणि निफ्टी 21,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी 50 मध्ये समावेश झाल्याच्या बातमीनंतर श्रीराम फायनान्समध्ये प्रचंड तेजी दिसत आहे. 1.25 टक्क्यांच्या वाढीसह निफ्टीमध्ये RILचे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर बजाज ऑटो सर्वाधिक घसरला आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये घसरण झाली. गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात पुन्हा एकदा सर्व निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते.

Share Market Opening
Share Market OpeningSakal

कोणते शेअर्स घसरले?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स वधारले. तर बजाज ऑटो, टाटा कंझ्युमर, अपोलो हॉस्पिटल्स, सिप्ला, टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Share Market opening
WTO Ministerial Conference : ‘ई-कॉमर्स’ला आणखी करसवलत नको ; भारतासह विकसनशील देशांची भूमिका

अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे शेअर्स घसरले तर पाच शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती तर अदानी विल्मरचे शेअर्स 1.31 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात जिओ फायनान्शिअल, पटेल इंजिनीअरिंग, ब्रँड कॉन्सेप्ट, युनि पार्ट्स इंडिया, महिंद्रा, एक्साइड, इंजिनियर्स इंडिया, एनएमडीसी लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.

निफ्टी निर्देशांकातील बदलांचा शेअर्सवर परिणाम

सर्व निफ्टी निर्देशांकातील बदलांचा परिणाम शेअर्सवर दिसून येत आहे. निफ्टी50 इंडेक्सच्या बाहेर असल्याच्या बातम्यांमुळे, UPL शेअर्स 1.8% पेक्षा जास्त घसरले आणि 467.05 च्या इंट्राडे नीचांकावर पोहोचले. गेल्या 12 महिन्यांत स्टॉक 32% ने घसरला आहे.

Share Market opening
Sunil Bharti Mittal : सुनील मित्तल यांना ब्रिटनचा सर्वोच्च सन्मान ; ‘केबीई’ सन्मान मिळविणारे पहिले भारतीय

रिलायन्स इंडस्ट्रीज 1.5% पेक्षा जास्त वाढले

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गुरुवारी 1.5% पेक्षा जास्त वाढ होत आहे. शेअरने इंट्राडे उच्चांक 2,957.45 गाठला. रिलायन्स आणि डिस्ने यांच्या संयुक्त उपक्रमाला मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. गेल्या 12 महिन्यांत स्टॉक 27% ने वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()