Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला, ऑटो-मेटल क्षेत्रात खरेदी

Share Market Opening: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. प्रमुख निर्देशांकांनी दिवसाची सुरुवात तेजीसह केली. सेन्सेक्स 270 अंकांनी वाढून 71,600 च्या पुढे गेला आहे. निफ्टीही 80 अंकांच्या वाढीसह 21,600 च्या पातळीवर आहे.
Share Market Updates Sensex opens 250pts higher Nifty at 21600 Adani Ports, Bajaj twins surge
Share Market Updates Sensex opens 250pts higher Nifty at 21600 Adani Ports, Bajaj twins surge Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 4 January 2024: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. प्रमुख निर्देशांकांनी दिवसाची सुरुवात तेजीसह केली. सेन्सेक्स 270 अंकांनी वाढून 71,600 च्या पुढे गेला आहे. निफ्टीही 80 अंकांच्या वाढीसह 21,600 च्या पातळीवर आहे.

बाजारपेठेत मेटल आणि वाहन क्षेत्रात सर्वाधिक खरेदी झाली. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स निफ्टीमध्ये 2-3 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर्स आहेत. तर बीपीसीएल सर्वाधिक घसरला आहे.

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली, तर बीपीसीएल, बजाज ऑटो, डॉ रेड्डीज लॅब्स, एल अँड टी आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये घसरण झाली.

गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली. शेअर बाजारातील वाढत्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस, इंडसइंड बँक आणि आयटीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर बजाज ऑटोमध्ये किंचित घसरण झाली.

Share Market Updates Sensex opens 250pts higher Nifty at 21600 Adani Ports, Bajaj twins surge
Adani-Hindenburg Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत

'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

आज शेअर बाजारात अदानी पोर्ट्स, एनएचपीसी आणि झोमॅटोच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून येत आहे. लार्जकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सचे निर्देशांकातही वाढ झाली.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये पटेल इंजिनीअरिंग, ओम इन्फ्रा, जिओ फायनान्शिअल, टाटा मोटर्स, ब्रँड कॉन्सेप्ट, कामधेनू, एचडीएफसी लाईफ, महिंद्रा, एक्साइड इंडस्ट्रीज, देवयानी इंटरनॅशनल, युनि पार्ट्स इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

Share Market Updates Sensex opens 250pts higher Nifty at 21600 Adani Ports, Bajaj twins surge
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री?

अदानी समूहाचे शेअर्स वाढले

अदानी समुहाचे सर्व शेअर्स जोरदार व्यवहार करत आहेत. समूहाचे सर्व 10 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. अदानी टोटल गॅस सर्वाधिक 2.52% ने व्यवहार करत आहे.

अदानी ग्रुपच्या शेअर्सचे एकूण मार्केट कॅप इंट्राडेमध्ये 30,780.36 कोटींनी वाढले आणि एकूण मार्केट कॅप 15.39 लाख कोटींवर पोहोचले आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.