Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; सेन्सेक्स 300 अंकांनी खाली, कोणत्या शेअर्सची होतेय विक्री?

Sensex-Nifty Today: मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. फेडच्या धोरणामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सेन्सेक्स 72,400 आणि निफ्टी 22000 च्या खाली व्यवहार करत आहे. बाजारात सर्वाधिक विक्री आयटी क्षेत्रात दिसून येत आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Market Opening Latest Update 19 March 2024 (Marathi News): मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. फेडच्या धोरणामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सेन्सेक्स 72,400 आणि निफ्टी 22,000 च्या खाली व्यवहार करत आहे.

बाजारात सर्वाधिक विक्री आयटी क्षेत्रात दिसून येत आहे. टीसीएस आणि विप्रो हे निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरणारे शेअर्स आहेत. सरकारी बँकिंग शेअर्समध्ये खरेदी होत असताना, एसबीआय सर्वाधिक तेजीत आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

BSE सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी फक्त 2 शेअर्समध्ये वाढ होत आहे तर 28 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये टाटा स्टील 1.54 टक्के आणि बजाज फायनान्स 0.37 टक्क्यांनी वर आहे. JSW स्टील 0.29 टक्क्यांनी वाढला आहे. Bharti Airtel 0.19 टक्क्यांच्या वाढीसह आणि ICICI बँक 0.08 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

शेअर बाजारात घसरण झाली
शेअर बाजारात घसरण झालीSakal

NSEच्या शेअर्सची स्थिती

NSE च्या निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी फक्त 11 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 39 शेअर्समध्ये घसरण होत आहे. निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस 1.28 टक्क्यांच्या वाढीसह आणि यूपीएल 0.68 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. बजाज ऑटो 0.54 टक्के, बजाज फायनान्स 0.42 टक्के आणि हिंदाल्को 0.32 टक्क्यांनी वाढले आहेत.

शेअर बाजारात घसरण झाली
शेअर बाजारात घसरण झालीSakal
Share Market
Tata Group: टाटा विकणार एका वर्षात 30 टक्के परतावा देणाऱ्या कंपनीचे शेअर्स; का आली ही वेळ?

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

शेअर बाजाराच्या व्यवहाराच्या सुरुवातीला अदानी पॉवरचे शेअर्स घसरले होते, तर अदानी समूहाच्या 10 पैकी 9 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, फेडरल बँक आणि एसबीआय कार्डचे शेअर तेजीत होते, तर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयआरसीटीसी आणि ॲक्सिस बँकेचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चर्चेत असणार?

आदित्य बिर्ला कॅपिटल: आदित्य बिर्ला सन लाइफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक OFS द्वारे 7% हिस्सा विकतील. हे भागभांडवल आज म्हणजेच 19 आणि 20 मार्च रोजी विकले जाईल. यासाठी 450 रुपये/शेअरची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

Share Market
financial burden : सोने महागल्याने बजेट विस्कळित ; लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांवर संकट

TCS: टाटा सन्स TCS चे शेअर्स विकून 1.1 बिलियन डॉलर जमा करेल. टाटा सन्सने या करारासाठी सिटी ग्रुप आणि जेपी मॉर्गन यांना संयुक्त बुकरनर म्हणून नियुक्त केले आहे. टाटा सन्स हे पैसे चिप प्लांटसाठी वापरू शकते.

अदानी समूहः अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणाच्या तपासाचे वृत्त खोटे आहे. समूहाच्या कोणत्याही कंपनीला यूएस न्याय विभागाकडून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. अदानी एनर्जीने या समूहाविरुद्ध अमेरिकेतील चौकशीच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे.

टाटा स्टील: टाटा स्टीलच्या यूकेच्या उपकंपनीने पोर्ट टॅलबोट प्लांटचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकिंग कोकच्या कमतरतेमुळे ऑपरेशन थांबवावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.