Share Market Closing: लोकसभा निकालापूर्वी शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर; कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing: सोमवारी (3 जून) देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त ट्रेडिंग सत्र पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले.
Share Market
Share Market TodaytSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 3 June 2024: सोमवारी (3 जून) देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त ट्रेडिंग सत्र पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले. दिवसभर बाजारपेठेत तेजी दिसून आली. सेन्सेक्स प्रथमच 76,400 च्या वर बंद झाला. बँक निफ्टी 51,000 च्या जवळ बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

सोमवारी निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. मिड कॅप 100 तीन टक्क्यांनी, स्मॉल कॅप दोन टक्क्यांनी, बँक निर्देशांक 4.3 टक्क्यांनी, निफ्टी ऑटो 2.58 टक्क्यांनी, निफ्टी एफएमसीजी एक टक्क्यांहून अधिक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 4.29 टक्क्यांनी वाढले.

Share Market Closing
Share Market TodaySakal

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारातील सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये अदानी पोर्ट, एनटीपीसी, एसबीआय, पॉवर ग्रिड, ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस आणि श्रीराम फायनान्स यांचा समावेश आहे, तर सर्वाधिक नुकसान करणाऱ्यांमध्ये आयशर मोटर्स, एलटीआय माइंडट्री, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, सन फार्मा ब्रिटानिया आणि डॉ. रेड्डीजचा समावेश आहे.

Share Market Closing
Share Market TodaySakal

सरकारी कंपन्यांमध्ये तेजी

अदानी समूहाच्या कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पीएसयू कंपन्यांचा भारतीय शेअर बाजाराच्या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. बँकिंग शेअर्सच्या वाढीमुळे, निफ्टी बँकेने प्रथमच 51,000 चा टप्पा ओलांडला आणि सुमारे 2000 अंकांच्या उसळीसह 50,979 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाले.

Share Market Closing
BSE SENSEXSakal

मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर

भारतीय शेअर बाजारातील या ऐतिहासिक तेजीमुळे शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने विक्रमी उच्चांक गाठला आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 426.24 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 412.12 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 14.12 लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.

एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विक्रमी विजयाचा अंदाज

लोकसभा निवडणुकीच्या सर्व एक्झिट पोलने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. न्यूज18 च्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 355 ते 370 जागा मिळण्याची शक्यता आहे.

यामध्ये भाजपच्या जागा 305 ते 315 च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. शेअर बाजाराला हे एक्झिट पोलचे निकाल आवडले आहेत, जे आजच्या वाढीचे सर्वात मोठे कारण आहे.

भाजपच्या विजयामुळे केंद्रीय पातळीवर राजकीय स्थैर्य आणि आर्थिक धोरणे सुरू राहतील अशी अपेक्षा असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रोकरेज फर्म इमकेने सांगितले की, गेल्या 10 वर्षांत जागतिक स्तरावर सर्व चढ-उतार असूनही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे, ही मोदी सरकारची मोठी उपलब्धी आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, बाजाराला ही स्थिरता पुढील 5 वर्षे कायम राहण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.