अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझच्या (Apollo Hospitals Enterprise) शेअर्समध्ये सध्या चांगलीच वाढ दिसून येत आहे. नुकताच या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला. सध्या तो 1.61 टक्क्यांच्या वाढीसह 6722.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. इंट्रा-डेमध्ये तो 1.89 टक्क्यांनी वाढून 6740.95 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मार्केट तज्ज्ञांच्या मते, त्यात आणखी वाढ होण्यास वाव आहे, म्हणजेच सध्याच्या पातळीवरही तुम्ही त्यात पैसे गुंतवू शकता.
अपोलो हॉस्पिटल्सचा कंसालिडेटेड एबिटदा डिसेंबर 2023 च्या तिमाहीत वार्षिक 21 टक्क्यांनी वाढून 613 कोटीवर पोहोचला. अपोलो हॉस्पिटल्सने सर्व सेगमेंट्समध्ये एक मजबूत ग्रोथ प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि डिजिटलही झाला आहे, ज्यामुळे तो एक मजबूत ओमनी चॅनेल प्लेयर बनला आहे.
ऑफलाइन मार्केटमध्ये अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझची मजबूत उपस्थिती आहे. त्याच्या डिजिटल व्यवसायाचा एबिटदा पुढील 6-8 तिमाहींमध्ये ब्रेकईव्हनवर पोहोचू शकतो. ब्रोकरेजने त्यांच्या आर्थिक वर्ष 2025 आणि आर्थिक वर्ष 2026 च्या एबिटदा अंदाजांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. एकूणच, त्याचा एबिटदा आर्थिक वर्ष 2024-आर्थिक वर्ष 2026 दरम्यान वार्षिक 16 टक्के चक्रवाढ दराने (CAGR) वाढू शकतो. ब्रोकरेजने आपले बाय रेटिंग 7050 रुपयांच्या टारगेटवर कायम ठेवले आहे.
गेल्या वर्षी 15 फेब्रुवारी 2023 रोजी अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स 4078.40 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. या पातळीपासून ते एका वर्षात 65 टक्क्यांहून तेजीसह नुकतेच 6740.95 रुपयांवर पोहोचले.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.