रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (RailTel Corporation of India) शेअर्स सध्या चांगले वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा शेअर 357.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीला बिहार सरकारच्या शिक्षण विभागाकडून 99 कोटींहून अधिक किमतीची ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. यासह कंपनीचे मार्केट कॅप 11,479.97 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 491.15 रुपये आहे.
या काँट्रॅक्टनुसार भारतीय रेल्वेची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी किट (शैक्षणिक शिक्षण साहित्य) पुरवेल. कंपनीला बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिलकडून 99.02 कोटीचे काँट्रॅक्ट मिळाले आहे. 13 जून 2024 पर्यंत हा काँट्रॅक्ट पूर्ण होईल, असे रेलटेल कॉर्पोरेशनने स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, कंपनीला राज्य परिवहन प्राधिकरण ओडिशाकडून सुमारे 88 कोटी किमतीची वर्क ऑर्डर मिळाली. फेब्रुवारीमध्ये कंपनीने युनिफाइड कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चरची अंमलबजावणी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून 125 कोटी रुपयांचा काँट्रॅक्ट मिळवले. आयपीएमपीएलएस लॅन इन्फ्रास्ट्रक्चर, व्हीओआयपी एक्सचेंज आणि आयपी-बेस्ड कंट्रोल कम्युनिकेशन तैनात करण्यासोबतच पश्चिम रेल्वेचे यूटीएन कम्युनिकेशन नेटवर्क अपग्रेड करणे या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट आहे.
जानेवारीमध्ये, कंपनीला जेएनव्हीएस शाळांमध्ये इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयटी सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी नवोदय विद्यालय समितीकडून 162.73 कोटची वर्क ऑर्डर देण्यात आली. हे काँट्रॅक्ट पीएम श्री उपक्रमांतर्गत देण्यात आले आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.