Share Market
Share MarketSakal

Share Market: इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धामुळे 'या' कंपन्यांच्या शेअर्सवर होणार परिणाम

Share Market: इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष सतत वाढत आहे
Published on

Share Market: इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष सतत वाढत आहे, या युद्धात आतापर्यंत 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 4,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर हे युद्ध पुन्हा एकदा जगासाठी संकटाचे कारण बनू शकते. हे युद्ध आणखी वाढल्यास त्याचा परिणाम अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर होऊ शकतो.

अशा अनेक भारतीय फार्मा कंपन्या आहेत ज्यांचा थेट इस्राइलशी संबंध नाही. मात्र या कंपन्या आपली औषधे इस्राइलला निर्यात करतात. या यादीत डॉ रेड्डीज, ल्युपिन आणि टोरेंट फार्मा कंपन्या आघाडीवर आहेत. डॉ. रेड्डीच्या शेअर्समध्ये 10 ऑक्टोबर रोजी घसरण झाली. दुपारी 12:14 वाजता शेअरची किंमत 0.50 टक्के घसरणीसह 5,460 रुपयांवर व्यवहार करत होता.

सन फार्माची उपकंपनी तारो फार्मा ही इस्राइली कंपनी आहे. इस्राइलवर हमासच्या हल्ल्यांचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असे तारो फॉर्माने म्हटले आहे. सन फार्मा ही भारतातील सर्वात मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आहे.

कंपनी अनेक देशांमध्ये औषधांची निर्यात करते. मात्र, कंपनीच्या एकूण महसुलात तारो फार्माचा वाटा फारसा जास्त नाही. सन फार्माच्या शेअर्समध्ये 10 ऑक्टोबर रोजी वाढ झाली. दुपारी 12 वाजता शेअरचा भाव 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 1,124.90 रुपये होता.

Share Market
Gold Silver Price: इस्राइल पॅलेस्टाईन युद्धाचा ताप! सोने पुन्हा झाले महाग, काय आहे आजचा भाव?

इस्रायलमध्ये टीसीएसचे अनेक प्रकल्प

TCS ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. इस्राइलमध्ये कंपनीचे अनेक मोठे प्रकल्प इस्राइलचे आहेत. इस्राइलमध्ये त्यांचे 1,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

कंपनीने म्हटले आहे की ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही काम करत आहे. 10 ऑक्टोबर रोजी TCS शेअरमध्ये घसरण दिसून आली. त्याची किंमत 0.40 टक्क्यांनी घसरून 3,623 रुपये झाली.

Share Market
Cotton Export: तब्बल 18 वर्षानंतर पांढऱ्या सोन्याच्या निर्यातीत घसरण, काय आहे कारण?

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.