टिटागढ रेल्वे सिस्टीमचे (Titagarh Rail) शेअर्स बुधवारी 8% ने घसरले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण जून तिमाहीतील कमजोर निकालानंतर झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 8% ने वाढून 66.9 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 61.79 कोटी होता. पण कंपनीचा महसूल आणि ऑपरेटिंग नफा (EBITDA) या दोन्हीमध्ये जून तिमाहीत घट झाली आहे.
जून तिमाहीत टीटागढ रेल्वेचा महसूल 1% घसरून 903.05 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 910.76 कोटी होता. त्याच वेळी, कंपनीचा ऑपरेटिंग नफा (EBITDA) या कालावधीत 4% ने घटून 101.83 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 106.1 कोटी होता. कंपनीचे मार्जिन गेल्या वर्षी 11.6% वरून किंचित कमी होऊन 11.3% झाले.
जून तिमाहीत फ्रेट सेगमेंटमधील टीटागढचा महसूल 13 टक्क्यांनी वाढून 842.1 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 746.08 कोटी होता. तर EBIT 97.2 कोटींवरून 5 टक्क्यांनी वाढून 101.9 कोटी झाला आहे. पण, मार्जिन एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत 13% वरून 12.1% पर्यंत घसरले.
याउलट पॅसेंजर सेगमेंटमध्ये कंपनीची कामगिरी कमजोर राहिली. जून तिमाहीत या सेगमेंटमध्ये महसूल 63 टक्क्यांनी घसरून 60.8 कोटीवर आला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 164.7 कोटी होता. त्याच वेळी, त्याची EBIT 41 टक्क्यांनी घसरून 3.7 कोटी झाली, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत 6.3 कोटी होती.
टीटागढने जून तिमाहीत 2,073 फ्रेट अर्थात मालवाहू वॅगनची विक्री केली, जी मागील तिमाहीत 2,700 आणि एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 1,835 कोटी होती. कंपनीने जून तिमाहीत 6 प्रवासी वॅगनची विक्री केली, तर मागील तिमाहीत हा आकडा 30 होता आणि एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 81 होता.
बुधवारी एनएसईवर दुपारी 3 च्या सुमारास, टीटागढ रेल सिस्टम्सचे शेअर्स 3.43 टक्क्यांनी घसरून 1,625.90 रुपयांवर व्यवहार करत होते. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 141 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.