IPO News: आज येणार सिग्नेचर ग्लोबलचा IPO, पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

Signature Global IPO: तुम्ही यामध्ये 22 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता.
IPO News
IPO NewsSakal
Updated on

Signature Global IPO: रिअल इस्टेट कंपनी सिग्नेचर ग्लोबलने गेल्या आर्थिक वर्षात घरांच्या मागणीमुळे 32% वाढीसह 3,430.58 कोटींची विक्री केली. कंपनी आज बुधवारी आपला IPO जारी करणार आहे. तुम्ही यामध्ये 22 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. IPO उघडण्यापूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांमार्फत एकूण 318.50 कोटी रुपये जमा केले आहेत.

18 सप्टेंबरलाच IPO अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 385 रुपये प्रति शेअर दराने एकूण 82,72,700 शेअर्स जारी केले आहेत.

IPO द्वारे कंपनी किती रक्कम उभारेल?

सिग्नेचर ग्लोबलने IPO च्या माध्यमातून एकूण 730 कोटी रुपये उभारण्याचे ठरवले आहे. तुम्ही या IPO मध्ये 20 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2023 दरम्यान पैसे गुंतवू शकता. कंपनीने जुलै 2022 मध्ये बाजार नियामक सेबीकडे IPO साठी DHRP सादर केला होता.

या IPO मध्ये कंपनीने 366 रुपये ते 385 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. या 730 कोटी रुपयांपैकी कंपनी 603 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे आणि 127 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी केले जातील.

या IPO मध्ये, कंपनीने पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी 75 टक्के हिस्सा, गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी 15 टक्के हिस्सा आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे.

IPO News
Virender Sehwag: विरेंद्र सेहवागला शेअर बाजाराची भीती का वाटते? ट्विट करत सांगितले...

कंपनीचे शेअर्स कधी लिस्ट केले जातील?

इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, कंपनी 27 सप्टेंबर रोजी ग्राहकांना शेअर्सचे वाटप करेल. ज्यांना शेअर्स मिळतील, त्यांच्या डिमॅट खात्यात 3 ऑक्टोबरला शेअर्स ट्रान्सफर केले जातील. कंपनीच्या शेअर्सची लिस्ट 4 ऑक्टोबर 2023 रोजी होण्याची शक्यता आहे.

IPO News
Bank Overdraft: बँक खाते रिकामे असले तरी मिळणार पैसे, जाणून घ्या काय आहे ओव्हरड्राफ्ट सुविधा?

कंपनी IPO चे पैसे कुठे वापरेल?

कंपनी आयपीओद्वारे उभारलेल्या एकूण 603 कोटींपैकी बहुताश कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. कंपनीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, मार्च 2023 पर्यंत एकूण 1,585.80 कोटी रुपयांची कमाई करूनही, तिला एकूण 63.70 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.