IPO Alert: भारतीय शेअर बाजारात सध्या आयपीओंची चलती असून, या आठवड्यात सहा कंपन्या बाजारातून ‘प्राथमिक शेअर विक्री’ अर्थात ‘आयपीओ’च्या माध्यमातून एकत्रितपणे ७,३०० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (इरेडा), गांधार ऑइल रिफायनरी इंडिया, फेडबँक फायनान्शिअल सर्व्हिसेस, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज आणि रॉकिंग डिल्स सर्क्युलर इकॉनॉमी या सहा कंपन्यांचे आयपीओ दाखल झाले आहेत.
या आधीच्या आयपीओंमधून चांगला परतावा मिळाल्याने गुंतवणूकदार नव्या आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, तर सकारात्मक वातावरणामुळे कंपन्यांनाही मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.
‘इरेडा’ला १.९८ पट बोली
केंद्र सरकारच्या मालकीच्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’चा आयपीओ २१ नोव्हेंबरला दाखल झाला असून पहिल्याच दिवशी त्यासाठी १.९८ पट बोली लागली आहे. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. प्रति शेअर ३० रुपये ते ३२ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे.
‘फेडबँक’ला उत्तम प्रतिसाद
वित्त क्षेत्रातील कंपनी असलेल्या फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेसचा ‘आयपीओ’देखील आजपासून खुला झाला असून, त्याला ३८ पट प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांना २४ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. कंपनीने प्रति शेअर १३३ ते १४४ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे.
‘फ्लेअर’ची चलती
स्टेशनरी व लेखनसामग्री उत्पादक असलेल्या फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीजच्या आयपीओसाठी आज पहिल्याच दिवशी २.१८ पट बोली लागली. २८८ ते ३०४ रुपये किंमतपट्टा असलेल्या या शेअरसाठी वैयक्तिक गुंतवणूकदारांनी २.८७ पट बोली लावली. २४ नोव्हेंबरपर्यंत हा आयपीओ खुला राहणार असून, ५९३ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
‘गंधार’ला मोठी मागणी
गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लि.च्या आयपीओसाठी पहिल्याच दिवशी वैयक्तिक गुंतवणूकदारांनी २.४ पट बोली लावली. कंपनीने १६० ते १६९ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून, अँकर गुंतवणूकदारांकडून प्रति शेअर १६९ रुपये भावानुसार, १५० कोटी रुपये उभारले आहेत. हा आयपीओ २४ नोव्हेंबरपर्यंत खुला आहे.
‘रॉकिंग डिल्स’ही तेजीत
‘एनएसई इमर्ज’ मंचावर नोंदणी होणाऱ्या या आयपीओला आज पहिल्याच दिवशी १४.५३ पट बोली लागली. १३६ ते १४० रुपये किंमतपट्टा असलेल्या या शेअरसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.