जयपूरस्थित एसके फायनान्स (SK Finance) ही नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी जी वाहने आणि व्यवसायासाठी कर्ज देते, लवकरच तीचा आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांचा या पब्लिक इश्यूद्वारे 2,200 कोटी उभारण्याचा मानस आहे. एसके फायनान्स दोन विभागांना कर्ज देते, पहिला म्हणजे वाहने आणि सूक्ष्म, आणि दुसरा आहे लघु आणि मध्यम उद्योग (MSME). डिसेंबर 2023 पर्यंत, 11 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात त्याच्या 535 शाखा आहेत.
दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP), आयपीओमध्ये 500 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांकडून 1,700 कोटीची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. ओएफएसअंतर्गत, नॉर्थवेस्ट व्हेंचर पार्टनर्स X-मॉरिशस आणि TPG ग्रोथ IV एसएफ पीटीई लिमिटेड 700 कोटीचे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील. तर इव्हॉल्व्हन्स कॉइनव्हेस्ट-I 75 कोटीचे शेअर्स विकणार आहे आणि इव्हॉल्व्हन्स इंडिया फंड-III लिमिटेड 25 कोटीचे शेअर्स विकणार आहे. याशिवाय एसके फायनान्सचे प्रवर्तक राजेंद्र कुमार सेतिया एचयुएफ 20 कोटीचे शेअर्स विकतील.
एसके फायनान्सने आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करण्यापासून मिळणारे उत्पन्न कॅपिटल बेस वाढवण्यासाठी करणार आहे. जेणेकरुन पुढे कर्ज आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी कंपनीच्या भविष्यातील व्यावसायिक गरजा पूर्ण करता येतील. या वर्षाच्या सुरुवातीला एसके फायनान्सने गुंतवणूकदारांकडून 1,328 कोटी उभे केले होते. मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट इक्विटीने कंपनीत मायनॉरिटी स्टेकसाठी 415 कोटीची गुंतवणूक केली होती.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेफरीज इंडिया प्रायवेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इनवेस्टमेंट ऍडवायझर्स आणि नोमुरा फायनान्शियल ऍडवायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायवेट लिमिटेड हे एसके फायनान्स आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.