स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणे धोकादायक मानले जाते. पण जर तुम्ही नीट विचाराअंती, अभ्यासाअंती एखाद्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला मजबूत नफा मिळू शकते हे ही तितकेच खरे आहे.
असाच एक स्टॉक म्हणजे सेनलब इंडस्ट्रीज(Cenlub Industries), ज्याने गेल्या 20 वर्षांत केवळ 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
ही स्मॉल कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 119.74 कोटी आहे. ही कंपनी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्सच्या व्यवसायात आहे. गेल्या 20 वर्षांत त्याचे शेअर्स 16,000 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. (Cenlub Industries Small Cap Share of one and half rupees reach now on 257 rupees investors are in profit )
21 मे 2003 रोजी सेनलब इंडस्ट्रीजच्या शेअर्सने पहिल्यांदा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाले तेव्हा त्याच्या शेअर्सची किंमत फक्त 1.55 रुपये होती, जी आता वाढून 257.55 रुपये झाली आहे.
म्हणजेच, गेल्या 20 वर्षांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत सुमारे 16,467.74% इतकी वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की 20 वर्षांपूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदाराने सेनलॅब इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1.65 कोटी झाले असते.
सेनलब इंडस्ट्रीजचे शेअर्स सध्या 257.55 रुपयांवर आहेत, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 59.55% वाढ झाली आहे, तर गेल्या एका वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 115.80% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत त्याच्या शेअर्सची किंमत 385.90% वाढली आहे.
म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 2.15 लाख झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर 1 आज त्याचे 4.85 लाख झाले असते.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.