स्मार्ट गुंतवणूक : डॉ. लाल पॅथलॅब्स

सध्या जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार कंपनीने वार्षिक आधारावर सुमारे ५३ टक्के वाढ दर्शवित १११ कोटी रुपये नफा कमविला आहे.
laal pathlabs
laal pathlabs sakal
Updated on

(शुक्रवारचा बंद भाव : रु. २,५९४)

भूषण गोडबोले

डॉ. लाल पॅथलॅब्स लि. हा भारतातील रोगनिदान चाचणी क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड असून, कंपनीचा देशभरात विस्तार आहे. कंपनी वैयक्तिक रुग्ण, रुग्णालये; तसेच आरोग्य सेवा प्रदाते व कॉर्पोरेट्स यांच्यासाठी दिल्या जातात. दिल्ली येथील नॅशनल रेफरन्स लॅब व कोलकता, बंगळूर येथील प्रादेशिक रेफरन्स लॅबसह कंपनीच्या सुमारे २७७ क्लिनिकल लॅब; तसेच १०९३८ पिक-अप पॉइंट्स आहेत. अचूक निदानासाठी कंपनी ‘एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, ‘डेटा अॅनालिटिक्स’ आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

‘सबर्बन डायग्नोस्टिक’च्या माध्यमातून कंपनी मुंबईमध्ये व्यवसायवृद्धीचे धोरण राबवित आहे. डॉ. अरविंद लाल हे या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, तर डॉ. ओमप्रकाश मनचंदा, हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मनचंदा यांनी ‘डॉ. लाल पॅथलॅब्स’चे एका छोट्या कंपनीतून सूचीबद्ध कंपनीत यशस्वी परिवर्तन केले आहे.

सध्या जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार कंपनीने वार्षिक आधारावर सुमारे ५३ टक्के वाढ दर्शवित १११ कोटी रुपये नफा कमविला आहे. कंपनी गुंतविलेल्या भांडवलावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवित व्यवसायवृद्धी करत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ४,२४५ रुपयांचा उच्चांक नोंदविल्यानंतर मार्च २०२३ पर्यंत या शेअरने १,७६२ रुपयांपर्यंत घसरण दर्शविली. यानंतर आलेखानुसार, या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला आहे.

आगामी काळात २,७५० रुपये या पातळीच्या वर बंद भाव दिल्यास तेजीचे संकेत मिळू शकतील. दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता व क्षमता लक्षात घेता दीर्घावधीसाठी या शेअरमध्ये मर्यादित गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.