Biggest IPO Market in 2023: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष खूप चांगले राहिले आहे. छोट्या ते मोठ्या व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांनी आयपीओ बाजारात आणला आहे. आता सॉफ्ट बँक 2023 चा सर्वात मोठा IPO आणण्याच्या तयारीत आहे. सॉफ्ट बँक ग्रुप कॉर्पच्या आर्म होल्डिंग लिमिटेडने आयपीओ आणण्याची योजना आखली आहे.
फाइलिंगमध्ये, कंपनीने म्हटले आहे की, या ऑफरचे नेतृत्व Barclays Plc, Goldman Sachs Group Inc, JP Morgan Chase & Co आणि Mizuho Financial Group Inc. या कंपन्या करतील. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पुढील आठवड्यात कंपनी IPO ची किंमत ठरवण्याची योजना आखत आहे.
(Softbank-owned chip design company Arm set for year's biggest IPO)
IPO चा आकार किती असेल?
कंपनीने शेअर विक्रीसाठीच्या अटींची माहिती सांगितली नाही. परंतु त्याचे मूल्य 60 अब्ज डॉलर ते 70 बिलियन डॉलर दरम्यान अपेक्षित आहे. केंब्रिज, यूके स्थित कंपनीने IPO ला समर्थन देण्यासाठी काही मोठ्या ग्राहकांशी देखील चर्चा केली आहे.
निधी उभारणीचे लक्ष्य किती आहे?
आर्म होल्डिंग लिमिटेडने आयपीओ मार्केटमधून 8 ते 10 अब्ज डॉलर्स उभे करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु हे लक्ष्य कमी असू शकते, कारण सॉफ्ट बँक ग्रुपने त्यात जास्तीत जास्त हिस्सा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फाइलिंगनुसार, सॉफ्ट बँकेने 64 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीचे व्यवहार केले आहेत.
सर्वात मोठा IPO असू शकतो
आयपीओ बाजारातील हा दोन वर्षांतील सर्वात मोठा आयपीओ असेल. यापूर्वी 2021 मध्ये, इलेक्ट्रिक-वाहन उत्पादक रिव्हियन ऑटोमोटिव्ह इंक. कडून 13.7 अब्ज डॉलरचा IPO आणला होता, ज्याचा आकार 13.7 अब्ज डॉलर होता.
हा IPO कदाचित सर्वात मोठा IPO होण्याच्या जवळपास असेल. आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडचा आहे, ज्याची किंमत 2014 मध्ये 25 अब्ज डॉलर होती.
कंपनी 32 अब्ज डॉलरमध्ये विकत घेण्यात आली
Acorn Computers, Apple आणि VLSI तंत्रज्ञान यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून 1990 मध्ये आर्म कंपनीची ओळख होती. यानंतर 1998 ते 2016 पर्यंत लंडन स्टॉक एक्स्चेंज आणि Nasdaq वर सूचीबद्ध झाले आणि त्यानंतर सॉफ्टबँकने 32 बिलियन डॉलरमध्ये कंपनी विकत घेतली.
नंतर सॉफ्ट बँकेने Nvidia ला 40 बिलियन डॉलरमध्ये विकण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधामुळे ते शक्य झाले नाही. हा करार झाला असता तर चिप मार्केटमधील हे सर्वात मोठे अधिग्रहण ठरले असते.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.