Ratan Tata: सीईओला हाकललं अन् कंपनी आली नफ्यात! शेअर्सही गगनाला भिडले, रतन टाटांशी आहे खास नातं

Starbucks New CEO: लोकप्रिय कॉफीहाऊस चेन स्टारबक्सने सीईओ लक्ष्मण नरसिंहन यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जेव्हापासून त्यांनी कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून स्टारबक्सच्या विक्रीत सातत्याने घट होत होती.
Starbucks
Starbucks Sakal
Updated on

Starbucks New CEO: लोकप्रिय कॉफीहाऊस चेन स्टारबक्सने सीईओ लक्ष्मण नरसिंहन यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जेव्हापासून त्यांनी कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून स्टारबक्सच्या विक्रीत सातत्याने घट होत होती. नरसिंहन यांच्या स्टारबक्समधील नोकरी दरम्यान, कंपनीचे मार्केट कॅप 40 अब्ज डॉलरने घसरले.

आता त्यांच्या जागी कंपनीने ब्रायन निकोल यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. निकोलचे नाव समोर आल्यानंतर स्टारबक्सच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.

स्टारबक्स शेअर्समध्ये 25 टक्के वाढ

लक्ष्मण नरसिंहन यांची हकालपट्टी केल्यानंतर स्टारबक्सने चिपोटल मेक्सिकन ग्रिल इंक.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन निकोल यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. लक्ष्मण नरसिंहन यांच्या राजीनाम्यानंतर, स्टारबक्सच्या शेअर्समध्ये 25 टक्के वाढ झाली.

ही आजपर्यंतची सर्वात जास्त वाढ असल्याचे म्हटले जात आहे. यासह, कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 21.4 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. दुसरीकडे, Chipotle च्या शेअर्समध्ये 7.5 टक्क्यांची घसरण झाली, ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 5.7 बिलियन डॉलरने कमी झाले.

Starbucks
Jodi Anoorabh: मुंबईचा मुलगा उडुपीची मुलगी; आयटीतील नोकरी सोडली, इन्टावर 2 लाख फॉलोअर्स, कमावतायत लाखो रुपये

रतन टाटा यांच्याशी आहे खास नातं

भारतातील स्टारबक्सचा व्यवसाय टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सद्वारे चालवला जातो. टाटा समूहाने भारतात स्टारबक्सची फ्रँचायझी घेतली आहे. Tata Consumer Products ने Starbucks ब्रँडला देशात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय केले आहे.

समूहाने देशातील विविध शहरांमध्ये आपली अनेक आउटलेट उघडली आहेत. भारतातील स्टारबक्स व्यवसाय हाताळणाऱ्या कंपनीचे नाव टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. हे पूर्वी टाटा स्टारबक्स लिमिटेड म्हणून ओळखले जात असे.

Starbucks
RBI Action: आरबीआयने येस बँकेला ठोठावला फक्त 500 रुपयांचा दंड; काय आहे कारण?

अमेरिकेतील सर्वोत्तम रेस्टॉरंटचे सीईओ

अनेक विश्लेषकांनी निकोल यांना अमेरिकेतील सर्वोत्तम रेस्टॉरंट सीईओ म्हटले आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सचे मायकेल हेलन म्हणाले की, ही नियुक्ती अतिशय चांगली आहे.

ओपेनहाइमर अँड कंपनीचे ब्रायन बिटनर म्हणाले की, स्टारबक्ससाठी निकोल ही 'ड्रीम हायरिंग' आहे. ब्रायन निकोलच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच स्टॉकचे रेटिंग चार पटीने वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.