Stock Market Correction: भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरूच आहे. आजही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 130 अंकांनी घसरून 79,411 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 57 अंकांनी घसरून 24,140 वर व्यवहार करत होता. निफ्टी बँकेत 250 अंकांची घसरण दिसून येत आहे.
तर एक दिवस आधी सेन्सेक्स 900 अंकांनी तर निफ्टी 300 अंकांनी घसरला होता. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, भारतीय शेअर बाजार एवढा का कोसळतोय, त्यामागची कारणे काय आहेत?