Stock Market Crash: जागतिक बाजारातून कमजोर संकेत मिळाल्यानंतर शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात मोठी घसरण झाली आणि सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी घसरला.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर्स लाल रंगात व्यवहार करताना दिसले. ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 900 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीमध्ये 250 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.