Stock Market Crash: शेअर बाजार क्रॅश, 2 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 2.14 लाख कोटी रुपये पाण्यात, नेमक काय झालं?

घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
Stock Market Crash
Stock Market CrashSakal
Updated on

Stock Market Crash: अनेक दिवसांच्या तेजीनंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. बाजार उघडताच दोन मिनिटांत सेन्सेक्स 750 अंकांनी घसरला. दुसरीकडे, निफ्टीमध्येही 100 हून अधिक अंकांची घसरण पाहायला मिळाली.

या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे अवघ्या दोन मिनिटांत 2.14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विदेशी बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली.

दुसरीकडे, गुंतवणूकदारांकडून होणारी नफा बुकिंग हेही यासाठी प्रमुख कारण मानले जात आहे. सेन्सेक्स 67,000 अंकांवर व्यवहार करत आहे.

तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सेन्सेक्स 70 आणि निफ्टी 21 हजार अंकांचा विक्रम करताना दिसू शकतो, त्याआधी निफ्टीसमोरील सर्वात मोठे आव्हान 20 हजार अंकांचा अडथळा आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण

शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे. बाजार उघडल्यानंतर दोन मिनिटांनी मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 750 अंकांनी घसरून 66,822.15 अंकांवर व्यवहार करत होता.

सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 595.21 अंकांच्या घसरणीसह 66,976.69 अंकांवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, निफ्टी 50 मध्येही मोठी घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, निफ्टी 152 अंकांच्या घसरणीसह 19,826.40 अंकांवर व्यवहार करत आहे.

आयटी कंपन्यांमध्ये मोठी घसरण

शेअर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयटी कंपन्यांमधील घसरण आहे. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सुमारे 8 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि निफ्टीमध्ये तो टॉप लूझर ठरला आहे.

एचसीएलच्या शेअर्समध्ये जवळपास 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. विप्रोचे शेअर्स सुमारे दोन टक्क्यांनी घसरले आहेत.

TCSचे शेअर्स 1.65 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. दुसरीकडे, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर्समध्येही नफा बुकिंग दिसून येत असून ते 1.62 टक्क्यांनी घसरले आहे.

Stock Market Crash
Reliance Demerger: बाजारात आला अंबानींचा नवा शेअर, किंमत रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा 10 पट स्वस्त

दोन मिनिटांत गुंतवणूकदारांचे 2.14 लाख कोटी बुडाले

शेअर बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे दोन मिनिटांत दोन लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. गुंतवणूकदारांचा नफा आणि तोटा बीएसईच्या मार्केट कॅपशी जोडलेला आहे.

काल बीएसई बंद झाला तेव्हा मार्केट कॅप 3,04,04,787.17 कोटी रुपये होते. दुसरीकडे, आज सकाळी 9.17 वाजता बीएसई 66,822.15 अंकांवर व्यवहार करत असताना, मार्केट कॅप 3,01,90,520.52 कोटी रुपयांपर्यंत खाली आले.

याचा अर्थ बाजार उघडल्यानंतर दोन मिनिटांतच गुंतवणूकदारांचे 2,14,266.65 कोटी रुपयांचे नुकसान झाले. 10 वाजेपर्यंत BSE चे मार्केट कॅप 3,03,39,951.78 कोटींवर पोहोचले होते.

Stock Market Crash
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.