Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला तेच शेअर्स कोसळले

Stock Market Crash: आज सोमवारी 7 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे, सरकारी कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. निफ्टीचा CPSE निर्देशांक 3.11 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे
Stock Market Crash
Stock Market CrashSakal
Updated on

Stock Market Crash: आज सोमवारी 7 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे, सरकारी कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. निफ्टीचा CPSE निर्देशांक 3.11 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे, तर निफ्टीचा PSE निर्देशांकही 2.82 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देणाऱ्या शेअर्समधील विक्रीमुळे रेल्वे-संरक्षण शेअर्सना सर्वाधिक फटका बसला आहे. 2023 मध्ये संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. पण घसरणीच्या वादळात आता PSU शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

Stock Market Crash
Ratan Tata Health Update: रतन टाटांची तब्येत बिघडली? सोशल मिडियावर पोस्ट करून केला अफवेचा खुलासा
रेल्वे शेअर्स कोसळले

गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे रेल्वे शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) चे शेअर्स सुमारे 7 टक्क्यांनी घसरून 460 रुपयांवर व्यवहार करत आहेत. Railtel Corporation of India चा शेअर 7 टक्क्यांनी, RITES 4.60 टक्क्यांनी, Ircon International 4 टक्क्यांनी, IRFC 4 टक्क्यांनी, Titagarh Railsystems 3 टक्क्यांनी घसरले आहेत.

संरक्षण क्षेत्रातील शेअर्स घसरले

शेअर बाजाराचे लाडके क्षेत्र समजल्या जाणाऱ्या संरक्षण क्षेत्रातील सरकारी शेअर्समधील वाढही थांबली आहे. गार्डन रिच शिपबिल्डिंगचे शेअर्स सुमारे 6 टक्के, Mazagon डॉक शिपबिल्डिंग 3.22 टक्के, कोचीन शिपयार्ड 3.76 टक्के, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 1.16 टक्के, भारत डायनॅमिक्स 4 टक्के, भारत इलेक्ट्रॉनिक्स 2.45 टक्के घसरत आहेत.

Stock Market Crash
Narishakti Success Story: आजीच्या हातची चव पोहचली जगभरात; दोन बहिणींनी 5 लाखात सुरु केला व्यवसाय, आज आहे 10 कोटींचा ब्रँड
उर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्री

अलिकडच्या वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या पॉवर सेक्टर शेअर्समध्येही विक्री दिसून येत आहे. यामध्ये NTPC 3.68 टक्के, NHPC 3.34 टक्के, पॉवर ग्रिड 3.14 टक्के, SJVN 5.29 टक्के, REC 3.68 टक्के, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन 4.15 टक्के, IREDA 4.18 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत. एलआयसीचे शेअर्स 3.86 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Summary

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.