Stock Market Crash Next 6 Months: दिवाळीनंतर शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. कारण बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आज 14 नोव्हेंबरला सलग 6व्या दिवशी बाजार घसरला आहे. बाजारात चौफेर विक्री होताना दिसत आहे. निफ्टीने 23600 आणि सेन्सेक्स 77600 चा स्तर गाठला आहे.
बाजारात सततच्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 23 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वाईट बातमी म्हणजे बाजारातील तज्ज्ञ आणखी घसरणीचा अंदाज वर्तवत आहेत.