Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये 1 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 4.85 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Share Market Today: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांक 1-1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose
Nifty 50, Sensex see deep cuts as investors loseSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 19 March 2024: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांक 1-1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या विक्रीत आयटी, फार्मा, बँकिंगसह अनेक क्षेत्रांवर दबाव होता. BSE सेन्सेक्समध्ये हा निर्देशांक 1.01 टक्क्यांच्या घसरणीसह 72,012.0 च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 1 टक्क्यांच्या घसरणीसह 21817 च्या पातळीवर बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात 1244 शेअर्सची खरेदी झाली तर 2572 शेअर्सची विक्री झाली.

Share Market
Share Market Sakal

निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1.28 टक्क्यांनी घसरला तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे तीन टक्क्यांनी घसरला तर निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात किंचित घसरण झाली.

Share Market
Share Market Sakal

कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 7 शेअर्समध्ये वाढ झाली असून 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले. बजाज फायनान्स 1.38 टक्क्यांनी आणि कोटक महिंद्रा बँक 0.57 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ICICI बँक 0.26 टक्क्यांच्या वाढीसह आणि भारती एअरटेल 0.23 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose
Electoral Bonds: वैयक्तिक मालमत्तेतून 'या' 10 उद्योगपतींनी खरेदी केले कोट्यवधींचे इलेक्टोरल बाँड; कोण आहेत ते?
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

अमेरिकेतील वाढत्या महागाई दरामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत गुंतवणूकगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीची आकडेवारी उद्या येणार आहे.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात बदल करण्याच्या घोषणेपूर्वीच बाजारात सावध व्यवहार होत असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अलीकडेच एका ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे की निफ्टीमध्ये 6500 अंकांची सुधारणा होऊ शकते आणि निफ्टी 15,500 च्या पातळीला स्पर्श करू शकतो.

निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद

आजच्या व्यवहारात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आयटी क्षेत्रात सर्वाधिक 2.90 टक्क्यांनी घसरण झाली असून मीडिया क्षेत्रात 2.45 टक्क्यांची घसरण झाली आहे. एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सही 2.16 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose
Tax Saving: 1.5 लाखांपर्यंत कर वाचवण्याची शेवटची संधी; बँकेची ही लोकप्रिय योजना ठरेल फायदेशीर

गुंतवणूकदारांचे 4.85 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 19 मार्च रोजी 373.94 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवारी 18 मार्च रोजी 378.79 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 4.85 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4.85 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.