Stock Market Crash: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटींचे नुकसान

Stock Market Crash: सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही जवळपास 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
Stock Market Crash Today Sensex Fall More Than 700 Points As India Canada Tension
Stock Market Crash Today Sensex Fall More Than 700 Points As India Canada Tension Sakal
Updated on

Stock Market Crash: देशांतर्गत शेअर बाजारात विक्री दिसून येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या मोठ्या घसरणीमुळे सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरून 66,728 च्या नीचांकी पातळीवर आला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही जवळपास 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

बाजारातील घसरणीमागील प्रमुख कारण म्हणजे बँक निफ्टीतील घसरण. आजच्या व्यवहारात, बँक निफ्टी 703 अंकांनी घसरला होता आणि सध्या तो 45,390 पर्यंत म्हणजेच 45,400 च्या खाली पोहोचला आहे.

Stock Market S&P BSE SENSEX
Stock Market S&P BSE SENSEXSakal

गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले

मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण दिसून येत असून 18 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप 3,23,00,115.59 कोटी रुपये होते आणि आज ते 3,20,43,114.30 कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ आजच्या ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅपमध्ये आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली आहे.

Stock Market Crash Today Sensex Fall More Than 700 Points As India Canada Tension
Tomato Prices: गगनाला भिडलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार उचलणार मोठे पाऊल?

रिलायन्सचे शेअर्स का पडत आहेत?

आजच्या व्यवहारात, रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 3 टक्क्यांनी घसरला आणि 2,355 रुपयांच्या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. आज एक्स्चेंजवर 2 कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली, तर एका महिन्याची सरासरी दैनंदिन उलाढाल 73 लाख शेअर्सची होती.

गेल्या आठवड्यात देशांतर्गत कच्च्या तेलाच्या विक्रीवरील विंडफॉल टॅक्स 10,000 रुपये प्रति टन वाढवण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेही शेअर्सवर परिणाम झाला आहे.

Stock Market Crash Today Sensex Fall More Than 700 Points As India Canada Tension
Canada India Tensions: भारत आणि कॅनडा वादाचा फटका शेअर मार्केटला? 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

सेन्सेक्सवर, एचडीएफसी बँक, आरआयएल, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले. एचडीएफसी बँकेने सोमवारी सांगितले की, एचडीएफसीमध्ये विलीन झाल्यानंतर बँकेच्या नॉन-परफॉर्मिंग मालमत्तेत वाढ होऊ शकते. त्यामुळे आज या शेअरमध्ये तीन टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.