Stock Market: शेअर बाजाराचा बबल फुटला? वॉरेन बफे इंडिकेटरने अगोदरच केली होती भविष्यवाणी; पुढे काय होणार?

Warren Buffett Indicator: सोमवारी शेअर बाजारात इतकी मोठी घसरण झाली की याची कल्पनाही कोणी केली नव्हती. गुंतवणूकदारांना असा धक्का बसला की 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3-3 टक्क्यांची घसरण झाली.
Warren Buffett Indicator
Warren Buffett IndicatorSakal
Updated on

Warren Buffett Indicator: सोमवारी शेअर बाजारात इतकी मोठी घसरण झाली की याची कल्पनाही कोणी केली नव्हती. गुंतवणूकदारांना असा धक्का बसला की 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3-3 टक्क्यांची घसरण झाली.

शेअर बाजारातील तज्ज्ञांना ही घसरण अपेक्षित होती का? उच्च स्तरावरून बाजारात घसरण होऊ शकेल असे काही तज्ज्ञांना वाटत होते, पण बाजार किती वेगाने आणि किती खाली जाईल हे कोणालाच माहीत नव्हते, पण वॉरेन बफे इंडिकेटरने ओळखले होते की बाजारात एक बबल तयार होत आहे.

बफेट्स इंडिकेटर भारताचे बाजार भांडवल GDP मध्ये मोजतो. या निर्देशांकाने दाखवून दिले की अर्थव्यवस्थेतील इक्विटी बाजारात बबल तयार होत आहे. भौगोलिक-राजकीय तणाव, निराशाजनक आर्थिक आकडेवारी आणि जपानी येन कॅरी ट्रेड संपुष्टात आणल्यानंतर यूएसमध्ये मंदीची भीती यामुळे जागतिक स्तरावर बाजाराचा मूड खराब झाला आणि त्यामुळे भारतीय बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.

Warren Buffett Indicator
Medical Insurance: आयुर्विमा योजना आणि प्रक्रिया सोप्या बनविण्याकडे लक्ष - अनुप बागची

शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणे

  • 2 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील रोजगार वाढीचा अहवाल समोर आल्यानंतर अमेरिकन बाजारात मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत जुलै महिन्यात नोकरीची वाढ अपेक्षेपेक्षा कमी आहे.

  • बँक ऑफ जपानने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आणि रोखे खरेदी कमी केली, त्यामुळे अमेरिकन टेक स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे.

  • 5 ऑगस्टला शेअर बाजारात घसरण होण्यामागे भौगोलिक-राजकीय तणाव हेही महत्त्वाचे कारण मानले जात आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा बाजारातील भावनांवर परिणाम झाला आहे.

Warren Buffett Indicator
Gautam Adani: गौतम अदानी सोडणार समूहाचे अध्यक्षपद, कंपनीची कमान कोण सांभाळणार, विभाजन कसे होणार?

शेअर बाजारात पुढे काय होणार?

गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावध राहिले पाहिजे. कारण येणाऱ्या काळात जागतिक पटलावर आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर बाजारासाठी येणाऱ्या काळात महत्त्वाच्या ट्रिगर्सवर लक्ष ठेवावे लागेल.

जसे की भारतीय रिझर्व्ह बँकेची चलन विषयक धोरण समितीची बैठक. या बैठकीत काय निर्णय होईल याचा परिणाम शेअर बाजारावर दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.