Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,000 अंकांनी खाली; कोणते 10 शेअर सर्वात जास्त घसरले?

Stock Market Crash: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जोरदार वाढ झाली आणि सेन्सेक्स-निफ्टीने जवळपास दररोज नवे रेकॉर्ड बनवले, पण या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी अचानक बाजाराच्या तेजीला ब्रेक लागला आणि दोन्ही निर्देशांक घसरले.
Stock Market Crash
Stock Market CrashSakal
Updated on

Stock Market Crash: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जोरदार वाढ झाली आणि सेन्सेक्स-निफ्टीने जवळपास दररोज नवे रेकॉर्ड बनवले. पण या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी अचानक बाजाराच्या तेजीला ब्रेक लागला आणि दोन्ही निर्देशांक घसरले.

बाजार उघडल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 140 अंकांची घसरण नोंदवली.

सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, दोन्ही शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी उघडल्याबरोबरच घसरले. 85,571 च्या आधीच्या बंदच्या तुलनेत सेन्सेक्सने घसरणीसह 85,208 च्या पातळीवर होता आणि काही मिनिटांतच तो 744.99 अंकांनी घसरून 84,824.86 च्या पातळीवर गेला.

सेन्सेक्सप्रमाणेच, निफ्टी देखील घसरला आणि 26,061 वर उघडला, त्याच्या मागील 26,178.95 च्या बंद पातळीपासून 211.75 अंकांनी घसरून 25,967.20 च्या पातळीवर पोहोचला.

Stock Market Today
Stock Market CrashSakal

दुपारी 12.30 वाजेपर्यंत ही घसरण आणखी वाढली. या काळात सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी घसरला आणि 84,530.32 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टी 284 हून अधिक अंकांनी घसरला आणि 25,882 च्या पातळीवर पोहोचला.

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स घसरले

शेअर बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान, BSE वर टॉप-30 लार्ज-कॅप कंपन्यांपैकी 23 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. ICICI बँकेचा शेअर सर्वात जास्त घसरला आणि तो 1.80 टक्क्यांच्या घसरणीसह 1283 रुपयांवर पोहोचला.

याशिवाय ॲक्सिस बँकेचा शेअर 1.63 टक्क्यांनी घसरला आणि तो 1251.40 रुपयांवर आला. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्सचे शेअर्स देखील 1.81 टक्क्यांनी घसरून 2997 रुपयांवर व्यवहार करत होते. तर टाटा मोटर्सचा शेअर 1.20 टक्क्यांनी घसरून 980 रुपयांवर आला.

Stock Market Today
Stock Market CrashSakal

स्मॉलकॅप- मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण?

बीएसई मिडकॅप 146.85 अंकांनी घसरून 49,343 च्या पातळीवर व्यवहार करत होता. सर्वात जास्त घसरलेल्या शेअर्समध्ये फिनिक्स लिमिटेडचा शेअर 5.93 टक्क्यांनी घसरला आणि 1773.05 रुपयांवर व्यवहार करत होता.

याशिवाय भारती हेक्साकॉम शेअर 3.46 टक्क्यांनी घसरला आणि 1449.95 रुपयांवर आला. BHELचा शेअर देखील घसरला आणि 3.44 टक्क्यांनी घसरून 277.75 रुपयांवर आला, तर मॅक्सहेल्थ शेअर 2.48 टक्क्यांनी घसरून 970.65 रुपयांवर व्यवहार करत होता.

Stock Market Today
BSE SENSEXSakal

दुसरीकडे स्मॉलकॅपमध्ये कामोपेंट्स शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आणि बाजार उघडल्यानंतर तो 20 टक्क्यांनी घसरून 37.32 रुपयांवर आला. याशिवाय RELTD शेअर देखील 4.99 टक्क्यांनी घसरून 139.04 रुपयांवर व्यवहार करत होता.

आज शेअर बाजारातील घसरणीमागील मुख्य कारणे कोणती?

1. जपानी शेअर बाजारात मोठी घसरण

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची चिन्हे आधीच दिसू लागली होती. जपानमुळे जागतिक निर्देशांक सुस्त दिसत होते आणि जेव्हा बाजार उघडला तेव्हा त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. जपानी शेअर बाजारात घसरण झाली आणि निक्केई निर्देशांक 4 टक्क्यांनी घसरला.

Stock Market Crash
Raghuram Rajan: रघुराम राजन मोदी सरकारच्या 'या' योजनेचे झाले फॅन; दिला महत्त्वाचा सल्ला

जपानी शेअर बाजाराच्या घसरणीमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा मोठा वाटा आहे. खरेतर, जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅट्सनी माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा यांची पुढील पंतप्रधान म्हणून निवड केली आहे, ते सध्याचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची जागा घेतील, ज्यांनी राजीनामा दिला आहे.

कोरियन बाजारही घसरणीसह व्यवहार करत होते. दरम्यान, अमेरिकेचा नॅस्डॅक निर्देशांकही किंचित घसरला आणि S&P 500 देखील लाल रंगात बंद झाला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज विक्रमी उच्चांकावर बंद झाला.

2. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेअर बाजारांवर दबाव आहे. याआधी शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 1,209.10 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. आज 30 सप्टेंबर रोजी, ही विक्री आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्ही.के.विजयकुमार म्हणाले, परकीय गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे चीनी शेअर्सची चांगली कामगिरी. चीनने अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी अलीकडेच आर्थिक धोरणात बदल केले आहेत.

3. मूल्यांकन

बाजार विश्लेषक काही काळापासून बाजाराच्या उच्च मूल्यांकनाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी बाजारात पैसे गुंतवण्यापूर्वी सावधगिरी बाळगली जात आहे. तसेच अनेक विभागांमध्ये प्रॉफिट बुकींग होताना दिसत आहे.

Stock Market Crash
Viral video Swiggy CEO: स्विगीच्या सीईओंचे वक्तव्य चर्चेत! जास्त वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय म्हणाले?

4. मध्य पूर्वमधील वाढता तणाव

हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह याच्या हत्येमुळे मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा एक वरिष्ठ कमांडरही मारला गेला. अशा परिस्थितीत इराण या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रशियाचे पंतप्रधान इराणला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मध्यपूर्वेतील लढाईत अमेरिका आणि रशियासारख्या बड्या देशांनी उडी घेतल्यास जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडू शकते. मध्यपूर्वेतील तणावामुळे बाजारात थोडीशी घसरण अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.