Guru Nanak Jayanti: गुरु नानक जयंतीनिमित्त आज शेअर बाजार, बँका आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी

Guru Nanak Jayanti: गुरु नानक जयंतीनिमित्त आज सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहेत.
Stock market holiday BSE, NS bank, government offices closed today due to Guru Nanak Jayanti
Stock market holiday BSE, NS bank, government offices closed today due to Guru Nanak Jayanti Sakal
Updated on

Guru Nanak Jayanti: गुरु नानक जयंतीनिमित्त आज सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहेत. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता देशभरात बँका बंद राहतील. यामुळे मंगळवारपासून शेअर बाजारातील व्यवहाराचे सत्र सुरू होणार आहे, शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांनाही आज सुट्टी असणार आहे.

इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि SLB सेगमेंटमध्ये आज कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. याशिवाय चलन डेरिव्हेटिव्ह बाजारातील व्यापारही बंद राहील. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही एक्सचेंज हाऊसमध्ये मंगळवारी, 28 नोव्हेंबरपासून व्यवहार पुन्हा सुरू होतील.

Stock market holiday BSE, NS bank, government offices closed today due to Guru Nanak Jayanti
Gold Rate Today: विवाहाचे बजेट बिघडले; सोन्या-चांदीच्या भावात वाढ, काय आहे आजचा भाव?

आठवडा चार दिवसांचा असेल

बीएसई आणि एनएसईच्या सूचनेनुसार, गुरु नानक जयंतीनिमित्त सोमवारी (27नोव्हेंबर) देशांतर्गत शेअर बाजार बंद राहील. या निमित्ताने दोन्ही प्रमुख शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. या वेळी मंगळवारपासून बाजार सुरू होणार आहे. अशा प्रकारे बाजारासाठी हा आठवडा पाच दिवसांऐवजी चार दिवसांचा असेल.

Stock market holiday BSE, NS bank, government offices closed today due to Guru Nanak Jayanti
PMLA: ईडीची मोठी कारवाई! सुपरटेकविरोधातील मनी लाँड्रिंगचा तपास डीएलएफपर्यंत पोहोचला

महिन्यातील दुसरी सुट्टी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बाजारात एक दिवस सुट्टी होती. यापूर्वी 14 नोव्हेंबर रोजी दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त देशांतर्गत शेअर बाजार बंद होता. याचा अर्थ नोव्हेंबर महिन्यात बाजाराला दोन सुट्या आल्या आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.