Stock Market Holiday: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, आजपासून पुढील तीन दिवस शेअर बाजार राहणार बंद

Stock Market Holiday: आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय सणानिमित्त देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि बँका बंद राहणार आहेत.
Stock market holiday BSE, NSE closed on account of Republic Day
Stock market holiday BSE, NSE closed on account of Republic DaySakal
Updated on

Stock Market Holiday: आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय सणानिमित्त देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि बँका बंद राहणार आहेत.

यासोबतच आज शेअर बाजारही बंद राहणार आहे. बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. यासोबतच आज मल्टी कमोडिटी मार्केटही बंद राहणार आहे.

पुढील तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज शुक्रवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. यानंतर 27 जानेवारी आणि 28 जानेवारीला शनिवार आणि रविवार असल्याने शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे. आता शेअर बाजार सोमवार 29 जानेवारी 2024 रोजी उघडेल. अशा परिस्थितीत आजपासून एकूण तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे.

Stock market holiday BSE, NSE closed on account of Republic Day
Microsoft Layoff : अ‍ॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड आणि एक्सबॉक्समधील तब्बल 1,900 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय - रिपोर्ट

2024 मध्ये शेअर बाजार इतके दिवस बंद असणार

  • 8 मार्च 2024- महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजारात सुट्टी असेल.

  • 25 मार्च 2024- होळीनिमित्त शेअर बाजारात सुट्टी असेल.

  • 29 मार्च 2024- गुड फ्रायडेमुळे शेअर बाजार बंद होणार आहे.

  • 11 एप्रिल 2024- ईद-उल-फित्र (रमजान ईद) मुळे शेअर बाजार बंद राहील.

  • 17 एप्रिल 2024- रामनवमीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

  • 1 मे 2024- महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

  • 17 जून 2024- बकरी ईदनिमित्त शेअर बाजारात सुट्टी असेल.

  • 17 जुलै 2024- मोहरममुळे शेअर बाजार बंद राहणार आहे.

Stock market holiday BSE, NSE closed on account of Republic Day
Budget 2024: केंद्र सरकार अन्न अनुदानासाठी 2.2 ट्रिलियन तरतूद करण्याची शक्यता; कोणाला होणार फायदा?
  • 15 ऑगस्ट 2024- स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहील.

  • 2 ऑक्टोबर 2024- गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

  • 1 नोव्हेंबर 2024- दिवाळीनिमित्त शेअर बाजारात सुट्टी असेल.

  • 15 नोव्हेंबर 2024- गुरु नानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

  • 25 डिसेंबर 2024- नाताळ सणानिमित्त शेअर बाजारात सुट्टी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.