Stock Market Holiday: आज शेअर बाजार राहणार बंद, काय आहे कारण?

Stock Market Holiday: आज शेअर बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री होणार नाही.
Stock Market Holiday BSE, NSE to remain closed today on account of Diwali Balipratipada
Stock Market Holiday BSE, NSE to remain closed today on account of Diwali Balipratipada Sakal
Updated on

Stock Market Holiday: या आठवड्यात शेअर बाजार आणखी एक दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीनंतर, दिवाळी बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर, आज मंगळवारी 14 नोव्हेंबर 2023 रोजी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीवर शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.

नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजाराला दोन दिवस सुट्ट्या आहेत - 14 नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदा आणि दुसरी 27 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त. या वर्षातील सुट्ट्यांवर नजर टाकली तर एप्रिल महिन्यात सर्वाधिक तीन सुट्ट्या होत्या.

आता हे वर्ष संपायला जेमतेम दीड महिना उरला आहे. या काळात शेअर बाजारात आणखी एक सुट्टी असणार आहे, ती म्हणजे ख्रिसमस. 25 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजार बंद असणार आहे.

सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली आणि BSE सेन्सेक्स 325 अंकांपेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 325.58 अंकांनी घसरून 64,933.87 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो 406.09 अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 82 अंकांनी घसरून 19,443.55 अंकांवर बंद झाला.

Stock Market Holiday BSE, NSE to remain closed today on account of Diwali Balipratipada
अगोदर अमेरिकेकडून निधी मिळाला, आता शेजारील देशांमध्ये व्यवसाय वाढवण्याचा अदानींचा प्लॅन

शेअर बाजारात घसरण का होत आहे?

तज्ज्ञांच्या मते, दिवाळीनंतर जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात सुधारणा झाली. पण औद्योगिक उत्पादनातील घट (IIP) आणि जागतिक व्याज दरात होणारी वाढ आणि महागाई या घटकांचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे.

Stock Market Holiday BSE, NSE to remain closed today on account of Diwali Balipratipada
Amazon Global : ‘अ‍ॅमेझॉन ग्लोबल’वर ५० हजार भारतीय उत्पादने

काल गुंतवणूकदारांचे 40,000 कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल काल 13 नोव्हेंबर रोजी 3,22,07 लाख कोटी रुपयांवर होते, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी 3,22,48 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत काल सुमारे 40,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()