Stock Market Holiday : NSE, BSE सह सर्व बाजार आज राहणार बंद; येत्या 10 दिवसांपैकी 7 दिवस बाजार...

BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, 30 मार्च, 4 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी व्यापार बंद राहील.
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal
Updated on

Ram Navami Stock Market Holiday: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. गुरुवारी रामनवमीनिमित्त शेअर बाजार, कमोडिटी मार्केट, चलन बाजार सर्व बंद राहणार आहेत. मात्र, कमोडिटी मार्केटचे सायंकाळचे सत्र पाच वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे येत्या 10 दिवसांपैकी 7 दिवस बाजार बंद राहणार आहेत.

BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, 30 मार्च, 4 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी व्यापार बंद राहील. कारण 30 मार्चला म्हणजेच गुरुवारी रामनवमीनिमित्त बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी व्यापार होईल. (Stock market holiday NSE, BSE to remain closed today on Ram Navam)

त्यानंतर महावीर जयंतीनिमित्त 4 एप्रिलला म्हणजे मंगळवारी बाजारपेठेत सुट्टी असेल. बुधवार आणि गुरुवारी बाजार सुरू राहील. त्यानंतर 7 एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त बाजार बंद राहणार आहे. बाजारातील सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट www.bseindia.com ला भेट देऊ शकता.

Stock Market Holiday List
Stock Market Holiday ListSakal
Share Market latest updates today
Made in India iPhone: 'मेड इन इंडिया' आयफोनला मोठी मागणी! ६५ टक्क्यांनी वाढली विक्री

एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार, येत्या 10 दिवसांत 3 दिवस बाजारात सुट्टी असेल. याशिवाय 4 दिवसांचा वीकेंड असेल. डिपॉझिटरी डेटानुसार, फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात एकूण 11.25 कोटी खाती आहेत. कोरोनानंतर डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

2023 मध्ये आतापर्यंत बाजार :

2023 मध्ये मार्केटचा प्रवास कसा होता याबद्दल जाणून घेऊयात. आतापर्यंत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. कारण या काळात निफ्टी 6% आणि सेन्सेक्स 5% घसरला आहे. बँक निफ्टी 8 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

या कालावधीत ITC चे शेअर्स तेजीत दिसत आहेत. सेअर्सने 2023 मध्ये आतापर्यंत 14 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे, तर बजाज फिनसर्व्हचा स्टॉक 21 टक्क्यांनी घसरला आहे.

Share Market latest updates today
जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.