Stock Market Holiday: आजही बंद राहणार शेअर बाजार आणि बँका, जाणून घ्या कारण

गुंतवणूकदारांना आता सोमवारी व्यवहार करण्याची संधी मिळणार आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Stock Market Holiday: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि BSE द्वारे दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार आज बंद राहील, याचा अर्थ असा आहे की तुम्ही आज म्हणजेच 7 एप्रिल 2023 रोजी व्यवहार करू शकणार नाही.

शेअर बाजाराच्या एप्रिल हॉलिडेच्या यादीनुसार, गुड फ्रायडेच्या निमित्ताने बीएसई आणि एनएसई बंद राहतील. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये बँकाही बंद राहणार आहेत. (Stock Market holiday on 7 April BSE, NSE shut for Good Friday, check dates markets will be closed in 2023)

BSE वर दिलेल्या माहितीनुसार, आज कोणताही व्यवहार होणार नाही. तसेच, इक्विटी विभागात कोणतीही कृती दिसणार नाही. दुसरीकडे, काल बाजार बंद झाल्यानंतर एखाद्याने इक्विटी विकली किंवा विकत घेतली असेल, तर ती दुसऱ्या दिवशी पोर्टफोलिओमध्ये जोडली जाईल.

Stock Market Holiday List
Stock Market Holiday ListSakal

एप्रिलमध्ये शेअर बाजारात तीन सुट्ट्या :

सुट्ट्यांच्या यादीनुसार या वर्षी एप्रिलमध्ये शेअर बाजार तीन दिवस बंद आहेत. गुड फ्रायडे म्हणजे एप्रिलची दुसरी सुट्टी. यापूर्वी 4 एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होता. आणि पुढील शेअर बाजाराची सुट्टी 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीला असणार आहे.

Share Market
RBI Repo Rate: आरबीआयने दरवाढ थांबवल्याचे अर्थतज्ञांकडून स्वागत

गुड फ्रायडे खास का आहे?

दरवर्षी इस्टर संडेच्या आधीचा शुक्रवार गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. यावेळी इस्टर संडे 9 एप्रिल रोजी येत आहे, गुड फ्रायडे येत्या शुक्रवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. या दिवसाला ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात.

असे मानले जाते की या दिवशी येशू ख्रिस्ताला म्हणजेच येशूला सर्व छळानंतर वधस्तंभावर बांधण्यात आले होते. ख्रिश्चन समाजातील लोक हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात, परंतु तरीही या दिवसाला गुड फ्रायडे म्हणतात.

Share Market
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.