Share Market Holiday: मार्च महिन्यात शेअर बाजार 'इतके' दिवस राहणार बंद; पहा संपूर्ण यादी

Share Market Holidays in March 2024: आता फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. मार्च महिन्यात शेअर बाजारात अनेक सुट्ट्या असणार आहेत. या कालावधीत शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. मार्च महिन्यात होळीचा सणही आहे.
Stock market holidays in March 2024 BSE, NSE to remain closed on these day check full list
Stock market holidays in March 2024 BSE, NSE to remain closed on these day check full list Sakal
Updated on

Share Market Holidays in March 2024: आता फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. मार्च महिन्यात शेअर बाजारात अनेक सुट्ट्या असणार आहेत. या कालावधीत शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. मार्च महिन्यात होळीचा सणही आहे. डिसेंबर 2023 मध्ये जारी केलेल्या NSE परिपत्रकानुसार, 2024 मध्ये एकूण 13 दिवस सुट्ट्या आहेत. यापैकी 5 सुट्ट्या शनिवार आणि 5 सुट्ट्या रविवारी असतील. (Stock market holidays in March 2024 BSE, NSE to remain closed on these day check full list)

शनिवार-रविवार व्यतिरिक्त 3 अतिरिक्त सुट्ट्या

शेअर बाजार मार्च महिन्यात 3 दिवस बंद राहील. 8 मार्चला महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असेल. याशिवाय सोमवार, 25 मार्चला होळी आणि शुक्रवार, 29 मार्चला गुड फ्रायडे असल्याने शेअर बाजारही बंद राहणार आहे.

या कालावधीत, NSE आणि BSE निर्देशांकांवर इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि SLB विभागांमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. याशिवाय नेहमीप्रमाणे दर शनिवार आणि रविवारी शेअर बाजाराला सुट्टी असेल.

Trading Holidays for 2024
Trading Holidays for 2024 Sakal

मार्च 2024 मध्ये शेअर बाजाराच्या सुट्ट्या

  • 8 मार्च, शुक्रवार- महाशिवरात्री

  • 25 मार्च, सोमवार - होळी

  • 29 मार्च, शुक्रवार - गुड फ्रायडे

Stock market holidays in March 2024 BSE, NSE to remain closed on these day check full list
Budget 2024: अजित पवार उद्या अंतरिम अर्थसंकल्प मांडणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

मार्चमध्ये शनिवार आणि रविवारी बाजार बंद राहील

  • 2 मार्च - शनिवार

  • 3 मार्च- रविवार

  • 9 मार्च- शनिवार

  • 10 मार्च-रविवार

  • 16 मार्च- शनिवार

  • 17 मार्च- रविवार

  • 23 मार्च-शनिवार

  • 24 मार्च- रविवार

  • 30 मार्च- शनिवार

  • 31 मार्च-रविवार

NSE ट्रेडिंग 2 मार्च रोजी आपत्ती पुनर्प्राप्ती साइटवर स्विच करेल

नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) शनिवार, 2 मार्च रोजी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या कालावधीत, NSE चा संपूर्ण व्यवसाय एका दिवसासाठी डिझास्टर रिकव्हरी साइटवर स्विच केला जाईल.

Stock market holidays in March 2024 BSE, NSE to remain closed on these day check full list
Tata Group IPO: पैसे तयार ठेवा! टाटा टेकनंतर टाटा ग्रुप आणणार आणखी 3 कंपन्यांचे IPO

पहिले विशेष थेट सत्र 45 मिनिटांचे असेल, जे सकाळी 9.15 वाजता सुरू होईल. दुसरे विशेष सत्र सकाळी 11.30 वाजता सुरू होऊन दुपारी 12.30 वाजता संपेल. ट्रेडिंग सायबर हल्ले, सर्व्हर क्रॅश किंवा इतर कोणत्याही समस्यांपासून संरक्षणासाठी डिझास्टर रिकव्हरी साइटची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.