Share Market Holiday Muharram: बुधवार 17 जुलै 2024 रोजी मोहरमच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहतील. हा सण इस्लामच्या चार पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या दिवशी शेअर बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. यामध्ये शेअर्स (इक्विटी), शेअर्सचे डेरिव्हेटिव्ह (इक्विटी डेरिव्हेटिव्ह) आणि सरकारी सिक्युरिटीज यांचा समावेश होतो. तसेच चलन आणि कमोडिटीशी संबंधित डेरिव्हेटिव्हचे व्यवहारही दिवसभर बंद राहणार आहेत.
साधारणपणे भारतीय शेअर बाजाराच्या ट्रेडिंगच्या वेळा सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत असतात. प्री-ओपनिंग मार्केट, ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी, सकाळी 9:00 वाजता उघडते. शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद असतो.
दरम्यान, शुक्रवारी 12 जुलै रोजी भारतीय शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला. BSE सेन्सेक्सने इंट्राडे उच्चांक 80,893.51 गाठला, तर NSE निफ्टी 50 ने 24,592.20 चा नवा विक्रम नोंदवला. ही वाढ प्रामुख्याने आयटी शेअर्समधील मोठ्या वाढीमुळे झाली.
विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 0.78% किंवा 622 अंकांनी वाढून 80,519.34 वर बंद झाला, तर NSE निफ्टी 50 0.77% किंवा 186 अंकांनी वाढून 24,502 वर बंद झाला.
आज सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत बाजार तेजीत राहिले आणि निफ्टीने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला तर सेन्सेक्स 290 अंकांनी वाढला. जागतिक बाजारातील वाढीमुळे शेअर बाजारातील तेजीचा कलही वाढला.
BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 290.46 अंकांनी वाढून 80,809.80 वर पोहोचला. NSE निफ्टीने 95.85 अंकांच्या वाढीसह 24,598 अंकांचा विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स लिस्टेड कंपन्यांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक वाढले.
अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, मारुती, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्सही तेजीत होते. टाटा स्टील, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्सला फटका बसला.
वर्ष 2024 मध्ये NSE आणि BSE या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विविध सण आणि इतर प्रमुख कार्यक्रमांसाठी किमान 14 शेअर बाजार सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
आगामी सुट्ट्यांमध्ये बाजार बंद राहणार आहे त्यात 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन (गुरुवार), 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, 1 नोव्हेंबर (शुक्रवार) दिवाळी, 15 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती (शुक्रवार) आणि 25 (बुधवार) डिसेंबरला ख्रिसमस यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.