Stock Tips: शेअर बाजाराच्या घसरणीत 'हे' 3 शेअर्स देतील चांगला परतावा, तज्ज्ञांना विश्वास

Stock Market Investment Tips: शेअर बाजारात दर्जेदार स्टॉक्स कायम चांगला परतावा देतात. पण चांगले स्टॉक्स शोधणं ही एक कला आहे, अभ्यास आहे. अशात एलकेपी सिक्युरिटीजचे रूपक डे यांनी 3 शेअर्सची नावे सुचवली आहेत,
Stock Market Investment Tips Rupak De, LKP Securities Welspun Corp L and T Finance Holdings Apollo Hospitals
Stock Market Investment Tips Rupak De, LKP Securities Welspun Corp L and T Finance Holdings Apollo Hospitals Sakal
Updated on

Stock Market Investment Tips: शेअर बाजारात दर्जेदार स्टॉक्स कायम चांगला परतावा देतात. पण चांगले स्टॉक्स शोधणं ही एक कला आहे, अभ्यास आहे. अशात एलकेपी सिक्युरिटीजचे रूपक डे यांनी 3 शेअर्सची नावे सुचवली आहेत, जी या बाजारातील सध्या सुरू असलेल्या गोंधळात गुंतवणूकदारांना शॉर्ट टाइममध्ये चांगला परतावा देऊ शकतात. कोणते आहेत हे स्टॉक्स जाणून घेऊयात

1. वेल्सपन कॉरपोरेशन (Welspun Corp)

वेल्सपन कॉरपोरेशनच्या स्टॉकसाठी 650 रुपये टारगेट असून स्टॉप लॉस 529 रुपयांवर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणुकदार अल्पावधीत 14 टक्के परतावा कमवू शकतात. डेली चार्टवर या स्टॉकमधील डिसेंडिंग कंसॉलिडेशन पॅटर्नमधून ब्रेकआउट झाला आहे.

याशिवाय, त्याची महत्त्वाची शॉर्ट-टर्म मूव्हिंग एव्हरेजही ओलांडली गेली आहे, जे सकारात्मक ट्रेंडचे लक्षण आहे. त्याचा आरएसआयही अर्थात रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स तेजीच्या टप्प्यात आहे, जो सकारात्मक संकेत देत आहे.

2. एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स (L&T Finance Holdings)

या स्टॉकसाठी 185 रुपये टारगेट असून स्टॉप लॉस 160 रुपयांवर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूकदार 9 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवू शकतात. टेकनिकल चार्टवर, स्टॉक हायर हाय आणि हायर लोसह तेजीचा कल दाखवत आहे, जो येत्या काही दिवसांत तेजीचा संकेत देतो.

आरएसआयमधील तेजीचा क्रॉसओव्हर या शेअरसाठी सकारात्मक आहे. अशा परिस्थितीत, ट्रेडर्स या स्टॉकमध्ये 169-167 रुपयांच्या रेंजमध्ये लाँग पोझिशन घेण्याचा विचार करू शकतात असेही ते म्हणाले.

Stock Market Investment Tips Rupak De, LKP Securities Welspun Corp L and T Finance Holdings Apollo Hospitals
Stock Market Holiday: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, आजपासून पुढील तीन दिवस शेअर बाजार राहणार बंद

3. अपोलो हॉस्पिटल्स (Apollo Hospitals)

या स्टॉकसाठी 6,500 रुपये टारगेट असून स्टॉप लॉस रु 5,750 आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 10 टक्के परतावा देऊ शकतो. अपोलो हॉस्पिटल्स नुकताच 5,915 रुपयांच्या मजबूत रझिस्टन्स स्तरावर बंद झाला, जो संभाव्य चढ-उतार दर्शवते.

आरएसआयमधील तेजीचा क्रॉसओव्हर येणाऱ्या काळात वाढ दाखवत आहे. ट्रेडर्स या स्टॉकमध्ये 5,880-5,930 रुपयांच्या रेंजमध्ये पोझिशन घेण्याचा विचार करू शकतात, पण त्यांनी स्टॉप लॉसबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे असे ते म्हणाले.

Stock Market Investment Tips Rupak De, LKP Securities Welspun Corp L and T Finance Holdings Apollo Hospitals
Budget 2024: व्यापारी संघटनेनं अर्थमंत्र्यांकडे मांडलं मोठं गाऱ्हाणं! कर्ज, जीएसटी अन् निर्याती संदर्भात...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.