Assembly Election 2023 Results: देशातील निवडणुकीच्या निकालाचा थेट परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत असल्याचे सामान्यत: यापूर्वी दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणूक निकालांचाही असाच परिणाम दिसेल का? कारण निवडणूक निकालापूर्वीच याचे संकेत दिसू लागले होते.
या कालावधीत बीएसईचे बाजार भांडवल प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. आता तीन राज्यांत भाजपचा विजय जवळपास निश्चित झाला असून, या निकालांमुळे उद्या शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळू शकते.
सेन्सेक्स-निफ्टीने इतिहास रचला
देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाची केवळ जनताच नव्हे तर शेअर बाजारही वाट पाहत असून, त्यातून समोर येणारे मोठे आणि सकारात्मक निकाल बाजारावर परिणाम करू शकतात, असे जाणकार आधीच सांगत होते.
आता भाजपने तीन राज्यांत चांगली कामगिरी केली असून छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत असल्याने सोमवारी शेअर बाजारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच निवडणुकीचे निकाल उद्या शेअर बाजाराची दिशा ठरवतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
विधानसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीबद्दल बोलायचे तर, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मधील ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे.
मात्र, तेलंगणात काँग्रेसची सत्ता असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील 230 जागांपैकी भाजप 161 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगडमधील 90 जागांपैकी भाजप 54 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर येथील 199 जागांपैकी भाजप 112 जागांवर तर काँग्रेस 71 जागांवर पुढे आहे. तेलंगणात काँग्रेस 65 जागांवर पुढे होते.
निकालापूर्वीच चिन्हे दिसत होती
निवडणुकीच्या राज्यांचे निकाल येण्यापूर्वीच, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले होते. एकीकडे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बीएसई सेन्सेक्स 492.75 अंकांच्या किंवा 0.74% च्या वाढीसह 67,481.19 च्या पातळीवर बंद झाला.
दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 134.75 अंकांच्या किंवा 0.67% च्या वाढीसह 20,267.90 च्या पातळीवर बंद झाला. निवडणुकीच्या निकालापूर्वी आलेली ही लाट उद्या सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी नवीन विक्रमात बदलू शकते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.