Share Market Opening: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टी 60 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: शेअर बाजारात आज संथ गतीने व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्स सुमारे 290 अंकांनी घसरला आणि 85,300 च्या वर उघडला. त्याचवेळी निफ्टीही 60 अंकांनी घसरून 26,100 च्या वर धावत होता. बँक निफ्टी 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 53,600 वर उघडला.
Share Market Latest Update
Share Market Latest Update Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 30 September 2024: शेअर बाजारात आज संथ गतीने व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्स सुमारे 290 अंकांनी घसरला आणि 85,300 च्या वर उघडला. त्याचवेळी निफ्टीही 60 अंकांनी घसरून 26,100 च्या वर धावत होता. बँक निफ्टी 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 53,600 वर उघडला.

हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, इन्फोईज, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया यांसारखे शेअर्स घसरले होते. मेटल इंडेक्समध्ये सुमारे 1.5%ची वाढ झाली.

Share Market Today
Share Market Opening Sakal

अमेरिकन बाजारात तेजी

यूएस शेअर बाजारात तेजी आहे. ब्लू-चिप डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज विक्रमी पातळीवर बंद झाला. कारण चलनवाढीच्या अहवालामुळे फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीची अपेक्षा वाढली आहे. यामुळे स्मॉल-कॅप शेअर्सनाही चालना मिळाली आणि वॉल स्ट्रीटच्या तीन मुख्य निर्देशांकांत तेजी दिसून आली.

जपानच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली. सत्ताधारी पक्षाने निवडणुकीनंतर मध्यवर्ती बँकेकडून आणखी व्याजदर वाढीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर सोमवारी जपानच्या बाजारात घसरण झाली.

Share Market Today
Share Market Opening Sakal
Share Market Latest Update
Stock Market IPO: गुंतवणुकीची मोठी संधी! येत्या दोन महिन्यात 60,000 कोटी रुपयांचे IPO येणार; पहा यादी

आशियाई बाजारात विक्री

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. GIFT NIFTY 0.28 टक्क्यांनी घसरत आहे. तर Nikkei मध्ये 4.87 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. स्ट्रेट टाइम्समध्ये 0.10 टक्के वाढ झाली आहे. तर हँग सेंग सुमारे 1.28 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. कोस्पी सुमारे 1 टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. तर शांघाय कंपोझिट 4.17 टक्के वाढ दर्शवत आहे.

Share Market Today
BSE SENSEXSakal

गुंतवणूकदारांचा कल कसा आहे?

NSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 27 सप्टेंबर 2024 रोजी, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजे FII हे निव्वळ विक्रेते होते आणि त्यांनी 1209.10 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच DII हे निव्वळ खरेदीदार होते आणि त्यांनी 27 सप्टेंबर 2024 रोजी 6886.65  कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

Share Market Latest Update
मत खेलो! इंडिया मत खेलो!

कोणते शेअर्स घसरले?

हिंदाल्को, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि ब्रिटानिया हे शेअर्स निफ्टी 50 मध्ये व्यवहाराच्या सुरुवातीला सर्वाधिक वाढले. Hero MotoCorp, Tech Mahindra, Coal India, M&M आणि ICICI बँक हे शेअर्स निफ्टी 50 मध्ये घसरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.