Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 80 अंकांनी वधारला, सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला

Share Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात थोड्या वाढीसह झाली. बाजार उघडताच बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ दाखवायला सुरुवात केली. सेन्सेक्स 84,600 च्या वर 300 अंकांनी वाढला होता. निफ्टीही 80 अंकांच्या वाढीसह 25,890 च्या आसपास होता.
Share Market Opening
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 1 October 2024: आज शेअर बाजाराची सुरुवात थोड्या वाढीसह झाली. बाजार उघडताच बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ दाखवायला सुरुवात केली. सेन्सेक्स 84,600 च्या वर 300 अंकांनी वाढला होता.

निफ्टीही 80 अंकांच्या वाढीसह 25,890 च्या आसपास होता. बँक निफ्टी सुमारे 230 अंकांनी वाढून 53,200 च्या वर होता. मिडकॅप निर्देशांकही वाढला. निफ्टीवर आयटी आणि पॉवर शेअर्स वधारत होते.

Share Market Today
Share Market OpeningSakal

कोणते शेअर्स तेजीत?

टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एसबीआय, इन्फोसिस, एल अँड टी यांचे शेअर्स वाढताना दिसत आहेत आणि ते टॉप गेनर आहेत. M&M चे शेअर्स देखील सेन्सेक्समध्ये सर्वाधिक तेजीत आहेत.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये वाढ तर 10 शेअर्स घसरत आहेत. एशियन पेंट्स, टायटन, सन फार्मा, एचयूएल आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.

Share Market Today
Share Market OpeningSakal

निफ्टीचे कोणते शेअर्स वाढले?

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 33 शेअर्समध्ये वाढ आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. टॉप गेनर्समध्ये टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स आणि इन्फोसिसच्या शेअर्सचा समावेश आहे. घसरलेल्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स, टायटन, हिंदाल्को, आयशर मोटर्स आणि सन फार्मा या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

Share Market Today
BSE SENSEXSakal
Share Market Opening
Life Insurance: विमा पॉलिसीचे नियम बदलले; पॉलिसी सरेंडर केल्यावर मिळणार जास्त पैसे, रिटर्नवरही होणार मोठा परिणाम

बीएसईचे बाजार भांडवल वाढले

BSE चे बाजार भांडवल 475 लाख कोटी रुपयांवर आले आहे आणि आज त्यात चांगली वाढ होताना दिसत आहे. BSE वर आज 3189 शेअर्सचे व्यवहार होताना दिसत आहे, त्यापैकी 2072 शेअर्स वाढत आहेत तर 986 शेअर्स घसरत आहेत. 131 शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत आहेत.

आशियाई बाजारात संमिश्र कल

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. आशियाबद्दल बोलायचे झाले तर GIFT NIFTY मध्ये 0.02 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर Nikkei 225 मध्ये 1.45 टक्क्यांची वाढ झाली आहे. स्ट्रेट टाइम्समध्ये 0.20 टक्के घसरण आहे.

Share Market Opening
Gold Rate: सोने वर्षाच्या अखेरीस 1,00,000 रुपयांच्यावर जाणार; ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वर्तवला अंदाज

अमेरिकन बाजार तेजीत

सोमवारी अमेरिकन बाजार तेजीत बंद झाले. सोमवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 17 अंकांनी वाढून 42330.15 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite मध्ये 70 अंकांची वाढ झाली आणि तो 18189.17 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक 24 अंकांनी वाढून 5762.48 च्या पातळीवर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.