Share Market Closing Latest Update 17 October 2024: देशांतर्गत बाजारासाठी हा सलग तिसरा आठवडा आहे ज्यात घसरण झाली आहे. बाजारात अस्थिरता आहे. आज गुरुवारी (17 ऑक्टोबर) निफ्टीच्या साप्ताहिक एक्स्पायरीमध्ये मोठी घसरण दिसून आली. बेंचमार्क निर्देशांक जवळपास दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरताना दिसले. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी घसरला, तर निफ्टी 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला.