Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

Share Market At Record High: आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात तेजी आहे. देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. व्यवसायाच्या संथ सुरुवातीनंतर, अल्पावधीतच बाजारात जबरदस्त तेजीची नोंद झाली आणि BSE सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच 84 हजारांचा टप्पा ओलांडला.
Share Market At Record High
Share Market At Record HighSakal
Updated on

Share Market At Record High: आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात तेजी आहे. देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. व्यवसायाच्या संथ सुरुवातीनंतर, अल्पावधीतच बाजारात जबरदस्त तेजीची नोंद झाली आणि BSE सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच 84 हजारांचा टप्पा ओलांडला.

सेन्सेक्सने प्रथमच 84,100 चा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. याआधी गुरुवारीही सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला होता. सेन्सेक्सशिवाय निफ्टीनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. निफ्टी नवीन शिखरावर आहे आणि प्रथमच 25,650 च्या पुढे गेला आहे.

Share Market Today
Share Market At Record HighSakal

देशांतर्गत बाजाराने आज थोड्या वाढीसह व्यवहाराला सुरुवात केली आणि सुरुवातीच्या सत्रात बाजारावर दबाव दिसून आला. सकाळी 9:15 वाजता सेन्सेक्स 350 अंकांनी तर निफ्टी जवळपास 100 अंकांनी वर होता.

काही मिनिटांनंतर, सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 175 अंकांवर आला होता आणि 83,370 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. नंतर व्यापारादरम्यान, बाजाराने चांगले पुनरागमन केले आणि 900 अंकांनी उडी मारून नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

Share Market At Record High
IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम
Share Market Today
Share Market At Record HighSakal

सकाळी 11 वाजता सेन्सेक्सने 900 हून अधिक अंकांच्या नेत्रदीपक वाढीसह 84,159 चा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच तो 84 हजारांवर पोहोचला आहे. तसेच निफ्टी 25,663.45 अंकांची उच्च पातळी गाठल्यानंतर 11 वाजता सुमारे 225 अंकांच्या वाढीसह 25,645 अंकांवर व्यवहार करत होता.

गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी रुपये कमावले

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनाही मोठा नफा झाला आहे. काल BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4,65,47,277 कोटी रुपये होते, ते आज 4 लाख कोटी रुपयांनी वाढून 4,69,33,988 कोटी रुपये झाले आहे.

Share Market At Record High
Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास?
Share Market Today
BSE SENSEXSakal

कोणते शेअर्स तेजीत?

बाजारातील विक्रमी वाढीत ज्या शेअर्सची सर्वाधिक वाढ झाली आहे, त्यात कोचीन शिपयार्डचे शेअर 10 टक्क्यांनी वाढून 1841 रुपयांवर पोहोचले आहेत. IIFL फायनान्स 10 टक्क्यांनी वाढून 541 रुपये झाला.

RITESचे शेअर्स 8 टक्के, BSEचे शेअर्स 9 टक्के, Mazagon Dockचे शेअर्स 7 टक्के, Cacrotech Devचे शेअर्स 5 टक्के, Mahindra & Mahindraचे शेअर्स 4 टक्के, Zomato 4 टक्के आणि JSW स्टीलचे शेअर्स 3.75 टक्क्यांनी वाढले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.